टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये आज पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडदरम्यान उपांत्य फेरीचा पहिला सामना होत आहे. या सामन्यामधील विजेता संघ १३ तारखेला अंतिम सामन्यामध्ये खेळणार आहे. आजच्या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघासमोर सलामीचे फलंदाज हा मोठा चिंतेचा विषय ठरणार आहे. आतापर्यंत पाकिस्तानच्या सालामीच्या फलंदाजांना स्पर्धेत म्हणावा तसा प्रभाव पाडता आलेला नाही. पाकिस्तान ही स्पर्धा जिंकेल अशी शक्यता फार पूर्वीपासून व्यक्त केली जात होती. मात्र पहिल्याच सामन्यामध्ये भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानला झिम्बाब्वेनेही पराभूत केल्याने संघाच्या वाटचालीवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं. मात्र नेदरलॅण्ड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्याने पाकिस्तानला उपांत्य फेरीपर्यंत धडक मारता आली.
नक्की वाचा >> सुंदर दिसत नाहीस तरी बुमराहला कसं पटवलं? विचारणाऱ्या ट्रोलरला संजना गणेशनचं उत्तर; म्हणाली, “तू स्वत: चप्पलेसारखा…”
आज सिडनीच्या मैदानात होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानसमोर न्यूझीलंडचं आव्हान आहे. मात्र पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांना फलंदाजीमध्ये चांगला लय गवसली नाही. अनेक सामन्यांमध्ये हे दोघेही फारच स्वस्तात माघारी परतले आहेत. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ हा या मालिकेमध्ये आतापर्यंत सर्वोत्तम खेळ करताना दिसला आहे. त्यामुळेच न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानी सलामीवीर टीकणार की ढेपाळणार हे आजच्या सामन्यामध्ये दिसून येईल.
नक्की वाचा >> “भारत पाकिस्तान अंतिम सामना व्हावा असं अनेकांना वाटतंय” असं म्हणत प्रश्न विचारताच बेन स्टोक्स म्हणाला, “आम्ही इथे फक्त…”
मागील काही वर्षांपासून रिझवान आणि बाबरने अनेक आंतरराष्ट्रीय सामने आपल्या सलामीच्या भागीदारीने गाजवले असले तरी यंदाच्या टी-२० विश्वचषकामध्ये एकदम विरुद्ध चित्र पहायला मिळालं. कर्णधार बाबर आझमलाही फारशा धावा या स्पर्धेत करता आलेल्या नाही. त्यामुळेच पाकिस्तानला कोणत्याच सामन्यात चांगली सुरुवात करता आलेली नाही. यावरुन अनेकदा सोशल मीडियावर बाबर आणि रिझवानला ट्रोलही करण्यात आलं.
नक्की वाचा >> T20 World Cup: …तर इंग्लंडविरुद्ध मैदानात न उतरता भारतीय संघ थेट वर्ल्डकप फायनल खेळणार
पाकिस्तानकडे उत्तम गोलंदाज असले तरी त्यांची फलंदाजी या दोन सलामीवीरांमुळे अधिक अडचणीच्या गर्तेत साडली आहे. उपांत्य फेरीमध्ये बाबर आझम आणि रिझवान चांगली खेळी करतील अशी पाकिस्तानी चाहत्यांना अपेक्षा आहे. मात्र या दोघांनाही ट्रोल करण्यात भारतीयांमध्ये चढाओढ लागल्याचं दिसत असून याचा प्रयत्य एका पाकिस्तान पत्रकाराच्या पोस्टवरील कमेंटमध्ये दिसून आलं.
नक्की वाचा >> T20 World Cup Mr 360: “एकच मिस्टर ३६० असून मी…”, म्हणणाऱ्या सूर्यकुमारला डेव्हिलियर्सचा रिप्लाय; म्हणाला, “तू फारच…”
भारतीयच नाही तर पाकिस्तानी चाहतेही रिझवान आणि बाबरला ट्रोल करताना दिसत आहे. पाकिस्तानी पत्रकार फरिद खानने ट्वीटरवर मंगळवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासंदर्भात एक ट्वीट करत प्रश्न विचारला. “बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान किती भागीदारी करतील? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्यांच्या भागीदारीची सरासरी किती असेल?” असा प्रश्न विचारला. यावर एका चाहत्याने रिझवान आणि बाबरला ट्रोल करत २० षटकांमध्ये १०८ धावांवर एकही गडी बाद नाही इतका स्कोअर पाकिस्तानचा असेल अशी कमेंट केली. इतरही अनेक चाहत्यांनी बाबर आणि रिझवानला काही विशेष कामगिरी उपांत्य फेरीत करता येणार नाही असं मत व्यक्त केलं आहे.
न्यूझीलंडविरोधात पाकिस्तानचं पारडं जड
न्यूझीलंड आणि पाकिस्तान टी-२० फॉरमॅटमध्ये आतापर्यंत २८ वेळा आमने-सामने आले आहेत. विशेष म्हणजे यापैकी ५० टक्क्यांहून अधिक वेळा पाकिस्तानने बाजी मारली आहे. पाकिस्तानने तब्बल १७ वेळा न्यूझीलंडला पराभूत केलं आहे. तर ११ वेळा न्यूझीलंडने पाकिस्तानवर मात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानचं पारडं याबाबतीत जड दिसत आहे.
नक्की वाचा >> World Cup Final: भारत जिंकला! पाकिस्तानही उपांत्य फेरीत; Ind vs Pak ड्रीम फायनल्सची शक्यता वाढली; समजून घ्या नेमकं गणित
टी-२० विश्वचषक स्पर्धांमधेही पाकिस्तानचं पारडं न्यूझीलंडपेक्षा जड दिसत आहे. आतापर्यंत हे दोन्ही संघ सहा वेळा टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्ये आमने-सामने आले असून यापैकी केवळ दोनदा न्यूझीलंडला यश मिळालं आहे. तर चारवेळा पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केलं आहे.