टी२० विश्वचषक २०२२ चा हंगाम यावेळी ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदावर खेळवला जाणार आहे. तसे, विश्वचषकाचा हा ८वा हंगाम १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. विश्वचषकाची सुरुवात पात्रता फेरीने होणार आहे, तर सुपर-१२ सामने २२ ऑक्टोबरपासून खेळवले जाणार आहेत. टी२० विश्वचषक २००७ मध्ये सुरू झाला. पहिलं सत्र खूपच रोमांचक होता, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वविजेता बनला होता. या विश्वचषकाचे आतापर्यंत ७ हंगाम झाले असून त्यात केवळ ६ संघांनी विजेतेपद पटकावले आहे.
वेस्ट इंडिज हा एकमेव संघ आहे ज्याने आतापर्यंत दोनदा टी२० विश्वचषक जिंकला आहे. त्याने २०१२ मध्ये पहिले विजेतेपद आणि २०१६ मध्ये दुसरे विजेतेपद पटकावले होते. याशिवाय पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी १-१ वेळा विजेतेपद पटकावले आहे. गेल्या वेळी ऑस्ट्रेलिया चॅम्पियन होता. यावेळी ती आपले जेतेपद कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
सर्व विश्वचषक विजेत्यांची कहाणीवर एक नजर टाकूया…
२००७, पहिला हंगाम
टी२० विश्वचषकाचा पहिला हंगाम दक्षिण आफ्रिकेच्या यजमानपदावर खेळला गेला. तेव्हा अगदी तरुण भारतीय संघाला ‘अंडरडॉग’ मानले जात होते, पण महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला. जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ५ धावांनी पराभव करत पहिले विजेतेपद पटकावले. त्यावेळी या स्पर्धेत १२ संघांचा सहभाग होता. शाहीद आफ्रिदी हा मालिकावीर होता तर मालिकेतील सर्वात जास्त धावा या ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडन आणि सर्वात जास्त विकेट्स या पाकिस्तानच्या उमर गुलने काढल्या होत्या.
२००९, दुसरा हंगाम
टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या सत्राचे यजमानपद इंग्लंडमध्ये आहे. पहिल्या सत्रात उपविजेते ठरलेल्या पाकिस्तानने यावेळी बाजी मारली. लंडनमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव केला. यावेळीही या स्पर्धेत १२ संघ खेळत होते. श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान हा मालिकावीर होता आणि त्यानेच मालिकेतील सर्वात जास्त धावा केल्या होत्या. सलग दुसऱ्या वेळेसही सर्वात जास्त विकेट्स या पाकिस्तानच्या उमर गुलने काढल्या होत्या.
२०१०, तिसरा हंगाम
वेस्ट इंडिजच्या यजमानपदी टी२० विश्वचषकाच्या तिसऱ्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रिकेटचा जनक मानल्या जाणाऱ्या इंग्लंड संघाने विजेतेपद पटकावले. क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडचे हे पहिले विश्वचषक विजेतेपद ठरले. किंग्स्टन ओव्हलवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ७ गडी राखून पराभव केला. केविन पीटरसन हा मालिकावीर होता तर मालिकेतील सर्वात जास्त धावा या श्रीलंकेच्या महेला जयवर्धने आणि सर्वात जास्त विकेट्स या ऑस्ट्रेलियाच्या डर्क नॅन्सने काढल्या होत्या.
२०१२, चौथा हंगाम
टी२० विश्वचषकाचा हा चौथा मोसम श्रीलंकेने आयोजित केला होता. यावेळी वेस्ट इंडिजने बाजी मारली. या कॅरेबियन संघाने कोलंबो येथे झालेल्या अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेचा ३६ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन हा मालिकावीर होता आणि त्यानेच मालिकेतील सर्वात जास्त धावा केल्या होत्या. तर सर्वात जास्त विकेट्स या श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसने काढल्या होत्या.
हेही वाचा : ‘कसला दबाव? मला समजत नाही…’, बाबर आझमच्या वक्तव्यावर शाहिद आफ्रिदीचे मोठे विधान
२०१२, पाचवा हंगाम
यावेळी बांगलादेशने टी२० विश्वचषकाच्या ५ व्या मोसमाचे आयोजन केले होते. यावेळी आशियाई खेळपट्ट्यांचा फायदा श्रीलंका आणि भारताला मिळाला. या दोघांमधील अंतिम सामना ढाका येथे झाला, ज्यामध्ये श्रीलंकेने ६ विकेट्सने विजय मिळवला. भारताचा विराट कोहली हा मालिकावीर होता आणि त्यानेच मालिकेतील सर्वात जास्त धावा केल्या होत्या. तर सर्वात जास्त विकेट्स या दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सच्या अहसान मलिक आणि इम्रान ताहिर काढल्या होत्या. त्या दोघांना विभागून हा किताब देण्यात आला.
२०१६, सहावा हंगाम
टी२० विश्वचषकाचा हा मोसम भारतातच आयोजित करण्यात आला होता. अशा स्थितीत भारतीय संघ जेतेपद पटकावू शकेल, असे मानले जात होते, मात्र तसे झाले नाही. यावेळी वेस्ट इंडिजने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडचा ४ गडी राखून पराभव केला. भारताचा विराट कोहली हा मालिकावीर होता आणि मालिकेतील सर्वात जास्त धावा बांगलादेशच्या तमीम इक्बालने केल्या होत्या. तर सर्वात जास्त विकेट्स या अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने काढल्या होत्या.
२०२१, सातवा हंगाम
पाच वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर, टी२० विश्वचषकाचा ७ वा मोसम भारताच्या यजमानपदी युएई मध्ये खेळला गेला. कोरोना काळात खेळलेल्या या मोसमात ऑस्ट्रेलियन संघ चॅम्पियन ठरला होता. दुबईत खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू वेड हा मालिकावीर होता आणि मालिकेतील सर्वात जास्त धावा पाकिस्तानच्या बाबर आझमने केल्या होत्या. तर सर्वात जास्त विकेट्स या श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने काढल्या होत्या.