टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नजरा आता टी२० विश्वचषकातील सुपर-१२ फेरीवर लागल्या आहेत. संघाचा फेरीतील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. दरम्यान, रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तो फलंदाज सूर्यकुमार यादवची खिल्ली उडवताना दिसत आहे. यावेळी संघातील सर्व खेळाडू उपस्थित होते.
संघसहकाऱ्यांसोबतचे, तर कधी आपल्या मुलांसोबतचे व्हिडिओही शेअर करत असतात. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचाही समावेश आहे. रोहित संघसहकाऱ्यांची नक्कलही करत असतो. यामध्ये तो फलंदाज सूर्यकुमार यादव याची खिल्ली उडवताना दिसत आहे. यादरम्यान भारतीय संघाचे अनेक खेळाडूही उपस्थित होते.
रोहित सूर्याची नक्कल करतो तेव्हा
मुंबई इंडियन्स संघाने इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रोहित शर्मा संघासमोर म्हणतो- “मी आता प्रत्येक विमानतळावर ज्या खेळाडूचा फोटो आहे त्याला फोन पाठवत आहे. त्याला सर्व माहिती आहे कोणाचा फोटो कुठल्या ठिकाणी काढला आहे, म्हणून मी त्याच्याकडे फोन देतो.” असे म्हणत मग रोहित त्यांची खिल्ली उडवतो आणि फोटो दरम्यान सूर्यकुमार जसा करतो तशाच पोज देतो. हे देखील खरे आहे कारण सूर्यकुमार यादव अनेकदा विमानतळावरील फोटो क्लिक करतात आणि सोशल मीडियावर अपलोड करतात.
सूर्यकुमार स्वतःच हसू लागला
रोहित जेव्हा सूर्यकुमारची हुबेहूब नक्कल करत होता तेव्हा एकत्र उभे असलेले खेळाडूही हसताना दिसत होते. यावर सूर्यकुमारही काही बोलला नाही, तो ही जोरजोरात हसायला लागला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- “कॅमेरा दिसला, तर फोटो तर काढलाच पाहिजे ना.”वास्तविक, त्यात एक इमोजी शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये हाताचा अंगठा दिसत आहे. सूर्याही त्याच स्टाइलमध्ये फोटो क्लिक करतो. युझवेंद्र चहल, अश्विन आणि इतर खेळाडूही या संधीचा पुरेपूर आनंद घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. आता सूर्यकुमार यादव टी२० विश्वचषकात फलंदाजी करेल तेव्हा सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
भारत आणि पाकिस्तानचे संघ २३ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये आमनेसामने येणार आहेत. त्याला ‘महामुकाबाला’ असेही म्हटले जात आहे. हे दोन संघ नुकतेच आशिया चषकामध्ये आमनेसामने आले होते, त्यानंतर भारताने साखळी फेरी जिंकली, तर पाकिस्तानने सुपर-४ फेरी जिंकली. गेल्या वर्षी टी२० विश्वचषकातच भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. आता टीम इंडिया त्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेन.