टी-२० विश्वचषक २०२२ मधील दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारतीय संघाला टी-२० विश्वचषकातून बाहेर पडाले लागले. भारताचा माजी सलामीवीर आणि सध्याचा क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने टी-२० विश्वचषक २०२२ मधील भारताच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानी सांगितले की टीम इंडियाने आशिया चषक २०२२ प्रमाणेच या स्पर्धेतही कामगिरी केली. चोप्रा म्हणाला की, ग्रुप स्टेजमध्ये भारताला फक्त दोन मोठे सामने मिळाले आणि एक सामना बाकी होता, पण यापैकी दोन सामने टीम हरली.
आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये म्हणाला, “सर्वप्रथम तुम्ही पाकिस्तान, नेदरलँड्स, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काहीही केले असो, परंतु हा तो सामना होता जेव्हा तुम्हाला हे दाखवायचे होते की, तुम्ही त्यासाठी वर्षभर तयारी केली आहे. असा हा सामना होता. जिथे तुम्हाला सपाट खेळपट्टीवर फलंदाजी करायची होती. तुम्हाला माहित आहे की समोरच्या संघाची फलंदाजीमध्ये खोली आहे, पण गोलंदाजी कमकुवत आहे.
तो पुढे म्हणाला, “ही २०० धावांची खेळपट्टी होती आणि आम्ही १६८ धावांवर थांबलो. तरीही, आम्ही तिथे पोहोचलो, कारण ६ षटकात ३८ धावा होत्या. तो साचा कुठे आहे, कारण तुम्ही एक चेंडू खेळलात. तू एक चेंडू खेळलास. सुरुवातीपासूनच आक्रमणाचा दृष्टिकोन ठेवण्यासाठी वर्षभर तयारी केली होती, पण ती इथे दिसली नाही. अख्खा विश्वचषक सोडा, हा सामना बघा, या सामन्याची तयारी केली होती.
आकाश पुढे म्हणाला, “तुम्हाला जे शेवटच्या क्षणी करायचे होते ते तुम्ही करू शकला नाही, तर तो हेतू कुठे गेला. जर ते वर्चस्व नसेल, तर तुम्ही खेळ कसा बदलू शकता. दुसरा माझ्या निवडीचा मुद्दा आहे. आशिया चषक २०२२ मध्ये दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यात कोण खेळणार हे तुम्हाला माहीत असावे. माहीत नसेल तर द्विपक्षीय मालिकेत कळायला हवे होते.”
चोप्रा म्हणाला, ”तुम्ही ऑस्ट्रेलियात सराव सामने खेळलात तर तुम्हाला तिथे कळले असते, पण नाही. लेगस्पिनरची धुलाई करेन, असा विचार करून तुम्ही ऋषभ पंतला खेळवले. पण तो कुठे खेळणार याचा आत्मविश्वास दिला नाही. तुम्ही त्याला शेवटी पाठवले, जेव्हा फिरकीपटू निघून गेले, कारण अशा फलंदाजाने मधल्या षटकांमध्ये खेळायला हवे.”