शनिवारी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने २८ वा वाढदिवस साजरा केला. वास्तविक, पाकिस्तान संघाव्यतिरिक्त, उर्वरित संघ सध्या टी२० विश्वचषक २०२२ खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे. १६ ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होत आहे, मात्र आज सर्व १६ संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद होती. याच पत्रकार परिषदेत बाबर आझम यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पत्रकार परिषदेत बाबर आझम यांनी केक कापला

खरंतर, टी२० विश्वचषक २०२२ च्या आधी सर्व १६ संघांच्या कर्णधारांमध्ये प्रश्नोत्तरांची फेरी झाली होती, पण त्याच दरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने केक मंचावर आणला. अ‍ॅरॉन फिंचने बाबर आझमला केक दिला, त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने हसत हसत स्टेजवरच केक कापला. बाबर आझमचा हा वाढदिवस कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. क्रिकेट चाहते हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत.

आयसीसीने फोटो शेअर करत अभिनंदन केले आहे

आयसीसीनेही त्याचवेळी एक फोटो शेअर करत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आयसीसीने फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हॅपी बर्थडे बाबर आझम, केक चांगला दिसत आहे.’ बाबर आझमच्या वाढदिवसानिमित्त मागवण्यात आलेला खास केक पाकिस्तान संघाच्या जर्सीच्या रंगापासून बनवण्यात आला होता. केकच्या वर एक क्रिकेट खेळपट्टी बनवली होती, ज्याच्या दोन्ही बाजूला स्टंप होते. या फोटोमध्ये उत्सव मूर्ती बाबर आझम व्यतिरिक्त नामिबिया, आयर्लंड, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँडचे कर्णधार दिसत आहेत.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaron finch brought a special cake for babar all the captains came together to celebrate avw