मेलबर्नच्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर आज टी-२० विश्वचषक २०२२ मधील अतिम सामना, इंग्लंड आणि पाकिस्तान संघात खेळला जात आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पुर्वी माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने २०२२ च्या टी२० विश्वचषकाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कोणता संघ विजेतेपद मिळवू शकतो आणि का? एबी डिव्हिलियर्सने इंग्लंड संघाला पाठिंबा दिला असून या संघात फायर पॉवर आहे आणि हा संघ चषक घरी नेईल असे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एबी डिव्हिलियर्सने ट्विटरवर एक पोल शेअर केला आणि लिहिले की यावेळी माझ्या बाजूने कोणताही अंदाज नाही, परंतु तुम्हीच सांगा की टी-२० विश्वचषक कोण जिंकेल. तथापि, त्याने तेच ट्विट रिट्विट केले आणि लिहिले, “माझे वैयक्तिक मत, मॅन टू मॅन, इंग्लंडने नक्कीच कप घरी नेला पाहिजे! परंतु, खेळाचे सौंदर्य आपल्याला सांगते की हे इतके सोपे नाही!”

त्याने पुढे लिहिले की, “खेळाची लय आणि सौंदर्य पाहता, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो संघ चांगला खेळेल तोच जिंकेल. आता कोण हरणार आहे कोणास ठाऊक?” इंग्लंड संघाने भारताला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता, तर पाकिस्तान संघ न्यूझीलंडला पराभूत करून टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ab de villiers reveals their pick for pakistan vs england t20 world cup 2022 final says they must surely take the cup home vbm
Show comments