Mohammad Nabi Record: अफगाणिस्तानच्या संघाने आपल्या झुंजार खेळीच्या जोरावर सेमीफायनलमध्ये धडक मारली. यंदाच्या टी-२० विश्वचषकातील अफगाणिस्तानची कामगिरी वनडे वर्ल्डकपपेक्षा एक पाऊल पुढे होती. अफगाणिस्तातनने गतवर्षी भारतात झालेल्या वर्ल्डकपमध्येही आपल्या खेळीची छाप सोडत आपल्या नावाचा दबदबा निर्माण करण्यास सुरूवात केली अन् यंदाच्या विश्वचषकात तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य देशांना पराभवाचे पाणी पाजत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारतानंतर सर्वाेत्कृष्ट आशियाई संघ म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे. अफगाणिस्तानचा क्रिकेट प्रवास काही सोपा नव्हता. पण या अफगाणिस्तानच्या साधारण संघ ते वर्ल्ड चॅम्पियन संघांना धुळीस मिळवणारा अफगाणिस्तान संघ म्हणून आपली ओळख मिळवली. या संपूर्ण प्रवासाचा एक साक्षीदार म्हणजे मोहम्मद नबी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहम्मद नबी हा अफगाणिस्तान क्रिकेटमधील स्थित्यंतर याचि देही याचि डोळा पाहणारा खेळाडू. मोहम्मद नबी हा ३९ वर्षांचा आहे, पण त्याची कामगिरी आणि त्याचा फिटनेस अजूनही तितकाच कमालीचा आहे. अफगाणिस्तानच्या संघाकडून सर्वाधिक ४५ देशांविरूद्ध विजय मिळवलेला मोहम्मद नबी हा एकमेव खेळाडू आहे. जागतिक क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूने एका संघाकडून इतक्या देशांविरूद्ध सामने जिंकलेले नाहीत. नबीने २००९ साली अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर २००८ मध्ये अफगाणिस्तानच्या संघाला वर्ल्ड क्रिकेट लीगच्या डिव्हिजन 5साठी पात्रता मिळाली होती.

हेही वाचा- Afg vs Ban T20 World Cup: रेफ्युजी कॅम्प ते वर्ल्डकप सेमी फायनल- अफगाणिस्तान संघाच्या विलक्षण प्रवासाची गोष्ट

तसं पाहायला गेलं तर १९९५ साली प्रथम अफगाण क्रिकेट फेडरेशनची स्थापना झाली आणि त्यानंतर तब्बल आयसीसीचे अॅफिलिएट सदस्यत्व मिळायला तब्बल सहा वर्षांचा काळ गेला. २००८ मध्ये अफगाणिस्तान संघाने वर्ल्ड क्रिकेट लीगच्या डिव्हिजन 5साठी पात्रता मिळवली. मग २००९ मध्ये २०११ साली होणाऱ्या वर्ल्डकपसाठी पात्रता मिळावी म्हणून आठोकाठ प्रयत्न केला पण अपयश पदरी पडले. हे प्रयत्न काही वाया गेले नाहीत आणि सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीमुळे आयसीसीने अफगाणिस्तानला वनडेचा दर्जा दिला.

हेही वाचा – AFG v BAN: ‘हळू खेळा, पाऊस येतोय’, अफगाणिस्तानच्या कोचचा इशारा आणि गुलबदीन पाय पकडून खाली पडला… पाहा VIDEO

उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर २०१३ मध्ये अफगाणिस्तानचा अफिलिएट दर्जा बदलून त्यांना असोसिएट दर्जा देण्यात आला. कसोटी खेळणारे दहा संघ, असोसिएट आणि अॅफिलिएट अशी आयसीसीची संघांची रचना आहे. यानंतर सातत्यपूर्ण प्रदर्शन असणाऱ्या अफगाणिस्तानला आयसीसीने २२ जून २०१७ रोजी कसोटी खेळण्याचा दर्जा बहाल केला. २०१८ मध्ये १४ ते १८ जून या कालावधीत बेंगळुरू इथे भारताविरुद्ध अफगाणिस्तानने कसोटी पदार्पण केलं. सुरक्षिततेच्या कारणास्तव अफगाणिस्तानचे सामने त्यांच्या देशात होत नाहीत. सुरुवातीला अफगाणिस्तानने युएई तसंच श्रीलंकेतील दंबुला इथे सामने खेळले. त्यानंतर बीसीसीआयने त्यांना मदतीचा हात दिला. यानंतर गेली अनेक वर्षे अफगाणिस्तानचा संघ भारतात सराव सामने खेळत मालिकाही खेळतो. या सर्वांसोबतच आता अफगाणिस्तानचा संघ टी-२० वर्ल्डकपमध्ये थेट सेमीफायनल खेळणार आहे.

हेही वाचा – ऋषभ पंतने सोपा झेल सोडल्याचे पाहता रोहितने भर मैदानात घातली शिवी, रागाने लालबुंद झालेल्या कॅप्टनचा VIDEO व्हायरल

मोहम्मद नबीचा अनोखा रेकॉर्ड

अफगाणिस्तानला अॅफिलिएट दर्जा मिळण्यापासून ते संघ जागतिक स्तरावरील सर्वाेत्कृष्ट संघांविरूद्ध खेळून सेमीफायनलमध्ये पोहोचला याचा साक्षीदार असलेला मोहम्मद नबी संघात सातत्याने खेळतही आहे. २००९ मध्ये पदार्पण केलेला नबी अफगाणिस्तानकडून सुरुवातीच्या काळात ज्या संघांविरुद्ध खेळला त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा नव्हता. पण आता अफगाणिस्तानने वनडेनंतर कसोटीतही स्थान मिळवले आहे. नबी त्याच्या कारकिर्दीत तब्बल ४५ देशांविरूद्ध खेळून विजय मिळवलेल्या संघाचा भाग आहे. मोहम्मद नबीची गणना जगातील सर्वाेत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. नबीने आतापर्यंत ३ कसोटी, १६१ वनडे आणि १२७ टी-२० सामने खेळले आहेत. या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने २७३ विकेट्स घेतले असून ५६४४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन शतके आणि २२ अर्धशतके झळकावली आहेत. मोहम्मद नबीने अफगाणिस्तानचे कर्णधारपदही भूषवले आहे.

हेही वाचा – IND v AUS: “आम्ही ऑस्ट्रेलियाला ओळखून आहोत…” भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, म्हणाला “आम्हाला जे करायचं होतं”

नबीच्या कारकिर्दीतील पहिला विजय हा डेन्मार्कविरूद्ध होता तर ४५वा विजय ऑस्ट्रेलियाविरूद्ध होता. कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये
अफगाणिस्तान संघाचा पहिला विजय पाकिस्तानविरुद्ध मिळाला. यानंतर आयर्लंड, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. अफगाणिस्तानने गेल्या वर्षभरात इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. याशिवाय पाकिस्तान आणि श्रीलंकेचाही पराभव केला. कसोटी खेळणाऱ्या संघांमध्ये अफगाणिस्तानला आतापर्यंत केवळ भारत आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करता आलेले नाही.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afg vs ban mohammed nabi part of wins 45 nation in international career for afganistan read about historical record in marathi bdg
First published on: 25-06-2024 at 18:22 IST