AFG vs BAN, T20 World Cup 2024: अफगाणिस्तान संघाने टी-२० विश्वचषक २०२४ च्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. बांगलादेशचा ९ धावांनी पराभव करत ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावे केली आहे. अफगाणिस्तानच्या या शानदार विजयामुळे ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर केले आहे. अफगाणिस्तानने पुन्हा एकदा आपल्या भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. नवीन उल हकने १८व्या षटकात सलग दोन विकेट्स घेत बांगलादेशला ऑल आऊट केलं. अफगाणिस्तानाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ११५ धावा केल्या. तर बांगलादेशचा संघ २० षटकांत ११६ धावाही करू शकला नाही. सततच्या पावसाने या सामन्यात मोठा व्यत्यय आणला आणि अखेरीस सामन्याचे एक षटकही कमी केले. ११.४ षटकांनंतर पाऊल पडल्याने डीएलएसनुसार अफगाणिस्तानचा संघ पुढे होता. त्यानंतर षटक कमी करण्यात आले आणि लक्ष्य ११४ धावांचे करण्यात आले. पण यानंतरही संघाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवला.

सामन्याच्या सुरूवातीपासूनच पावसाचा लपंडाव सुरू होता, तर वाराही सामन्यात व्यत्यय आणत होता. बांगलादेशकडे अफगाणिस्तानने दिलेल्या ११६ धावा १२.१ षटकांत पूर्ण करत सेमीफायनल गाठण्याची मोठी संधी होती. पण अफगाणिस्तान कडवी झुंज देत मैदानात होता. रशीद खानने ४ विकेट्स घेत बांगलादेशला अडवले. तर अफगाणिस्तानने अखेरच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करत आणि झटपट विकेट्स घेत बांगलादेशवर दबाव टाकला. दोन्ही संघांमध्ये विजयासाठी अटीतटीची लढत सुरू होती. बांगलादेशला १८ चेंडूत १६ धावांची आवश्यकता होती. गुलबदीनने १७व्या षटकात अवघ्या ४ धावा दिल्या. तर १८वे षटक नवीन उल हकने तिसऱ्या चेंडूवर तस्कीनला क्लीन बोल्ड केले तर चौथ्या चेंडूवर मुस्तफिजूरला पायचीत करत अफगाणिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Gulbadin Naib Faking Injury to Waste Time
AFG v BAN: ‘हळू खेळा, पाऊस येतोय’, अफगाणिस्तानच्या कोचचा इशारा आणि गुलबदीन पाय पकडून खाली पडला… पाहा VIDEO
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Rohit Sharma abused Rishabh Pant and badly scolds for Dropped Easy Catch of Mitchell Marsh Video Viral
ऋषभ पंतने सोपा झेल सोडल्याचे पाहता रोहितने भर मैदानात घातली शिवी, रागाने लालबुंद झालेल्या कॅप्टनचा VIDEO व्हायरल
Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”

हेही वाचा – IND vs AUS: भारताने विश्वविक्रमासह सेमीफायनलमध्ये ऐटीत मारली धडक, ऑस्ट्रेलियाविरूद्ध रोहित-कुलदीप ठरले मॅचविनर

अफगाणिस्तानने दिलेल्या अवघ्या ११६ धावांचे लक्ष्य १२० चेंडूमध्ये पूर्ण करायचे होते. पण बांगलादेश संघ अवघ्या १०५ धावाचं करू शकला. अफगाणिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर फलंदाज जास्त काळ मैदानात टिकू शकले नाहीत. बांगलादेशकडून एकट्या लिटन दासने ४९ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या, तर सौम्या सरकारने १० आणि ह्रदयने १४ धावा केल्या याशिवाय इतर सर्व फलंदाज एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. अफगाणिस्तानकडून नवीन उल हक आणि रशीद खानने प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या आहेत. तर गुलबदीन आणि फजलहकने प्रत्येकी १ विकेट मिळवली.

हेही वाचा – ऋषभ पंतने सोपा झेल सोडल्याचे पाहता रोहितने भर मैदानात घातली शिवी, रागाने लालबुंद झालेल्या कॅप्टनचा VIDEO व्हायरल

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची फलंदाजी बाजू चांगलीच ढासळली. सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज वगळता कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. गुरबाजने ५५ चेडूंत १ षटकार आणि ३ चौकारांसह ४३ धावा केल्या. तर इब्राहिम झादरानने २९ चेंडूत १८ धावांचे योगदान दिले. तर अझमतुल्लाने १०, गुलबदीनने ४ धावा केल्या, नबी १ धाव तर करीम ७धावा करून बाद झाला. यानंतर रशीद खानने १९ धावा केल्या. यासह अफगाणिस्तानने ५ विकेट्स गमावत ११५ धावा केल्या. अधिक धावा न केल्याने अफगाणिस्तानवर धावा वाचवण्याचं मोठं काम होतं. बांगलादेशकडून रशीद हुसेनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर तस्कीन. मुस्तफिजूरने १-१ विकेट मिळवली.