AFG vs BAN, T20 World Cup 2024: अफगाणिस्तान संघाने टी-२० विश्वचषक २०२४ च्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. बांगलादेशचा ९ धावांनी पराभव करत ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावे केली आहे. अफगाणिस्तानच्या या शानदार विजयामुळे ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर केले आहे. अफगाणिस्तानने पुन्हा एकदा आपल्या भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. नवीन उल हकने १८व्या षटकात सलग दोन विकेट्स घेत बांगलादेशला ऑल आऊट केलं. अफगाणिस्तानाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ११५ धावा केल्या. तर बांगलादेशचा संघ २० षटकांत ११६ धावाही करू शकला नाही. सततच्या पावसाने या सामन्यात मोठा व्यत्यय आणला आणि अखेरीस सामन्याचे एक षटकही कमी केले. ११.४ षटकांनंतर पाऊल पडल्याने डीएलएसनुसार अफगाणिस्तानचा संघ पुढे होता. त्यानंतर षटक कमी करण्यात आले आणि लक्ष्य ११४ धावांचे करण्यात आले. पण यानंतरही संघाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा