Afghanistan players Turns Chef in Barbados: सध्या टी-२० विश्वचषक २०२४ मधील सुपर८ फेरीतील सामने खेळवले जात आहेत. हे सामने वेस्ट इंडिजमधील बार्बाडोस, अँटिगा, सेंट लुसिया अशा वेगवेगळ्या मैदानांवर खेळवले जात आहेत. यादरम्यान सुपर८ मध्ये पोहोचलेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूंसमोर वेगळाच पेच निर्माण झाला आहे. अफगाणिस्तानचे खेळाडू स्वत:चे जेवण स्वत: बनवत असल्याचे समोर आले आहे.
गुरुवारी भारतीय संघाचा सामना अफगाणिस्तानशी झाला. केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव केला. या सामन्यासाठी अफगाणिस्तानचा संघ बार्बाडोसमध्ये ज्या टीम हॉटेलमध्ये राहत होता तिथे हलाल मांस मिळू शकले नाही आणि यामुळेच खेळाडूंना स्वतःचे जेवण स्वतः बनवावे लागले किंवा हॉटलबाहेर जाऊन जेवण्याचा पर्याय त्यांच्याकडे होता. हलाल मांस हे अफगाणिस्तानमधील खेळाडूंच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे.
ब्रिजटाऊन हॉटेलमध्ये हलाल आहे की नाही याबद्दल अनिश्चितता होती. हलाल मांस कॅरिबियन बेटांवर मिळते, परंतु सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या मेनूमध्ये ते आहे की नाही हे निश्चित नव्हतं. २०२३ मध्ये भारताता झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये
अफगाणिस्तानच्या एका खेळाडूने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “आमच्या हॉटेलमध्ये हलाल मांस उपलब्ध नव्हतं. त्यामुळे मग कधी आम्ही स्वतः जेवण केलं तर कधी बाहेर जेवणासाठी गेलो. भारतात झालेल्या वनडे विश्वचषकात आम्हाला ही समस्या आली नाही. पण वेस्ट इंडिजमध्ये हलाल मांस मिळत नाहीय. सेंट लुसियामध्ये हलाल मांस मिळतं होतं, पण इथे सर्वच ठिकाणी ते उपलब्ध नाही, आमच्या एका मित्राने आमच्यासाठी हलाल मांस आम्हाला मिळेल अशी व्यवस्था केली आणि त्यानंतर आम्ही ते स्वत: बनवले.”
हेही वाचा – T20 WC 2024: एडन मारक्रमच्या अफलातून कॅचने फिरली मॅच; उत्कंठावर्धक लढतीत आफ्रिकेचा इंग्लंडवर ७ धावांनी विजय
हलाल मांस म्हणजे काय?
हलाल हा मूळचा अरेबिक शब्द आहे. याचे मराठीत भाषांतर करायचे झाल्यास ‘परवानगी असलेला’ असे म्हणता येईल. कुराणमध्ये हराम या शब्दाच्या विरुद्ध हलाल या शब्दाचा वापर करण्यात आलेला आहे. हराम म्हणजे निषिद्ध असलेला. म्हणजेच कुराणमध्ये काय निषिद्ध आहे आणि कशाला अनुमती आहे, हे सांगण्यासाठी अनुक्रमे हराम आणि हलाल असे शब्द वापरण्यात आले आहेत. हलाल हा शब्द विशेषत: इस्लाममध्ये आहारविषयक कायद्यांशी संबंधित आहे. इस्लाममध्ये डुकराचे मांस आणि मादक पदार्थ (मद्य) या दोन गोष्टी हराम मानल्या जातात. त्यासह एखादे मांस हलाल आहे हे ठरवण्यासाठी मांसासाठी प्राण्याला कशा प्रकारे मारलेले आहे? त्यावर कशा प्रकारे प्रक्रिया केलेली आहे? अशा अनेक बाबींचा विचार केला जातो. सर्व निकष पूर्ण केल्यानंतरच ते मांस हलाल आहे की नाही, हे ठरवले जाते.