AFG Coach Slams ICC After SA Victory: संपूर्ण विश्वचषकात दमदार कामगिरी करूनही अफगाणिस्तानचा संघ आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात पराभूत होऊन उपांत्य फेरीतून बाहेर पडला. या पराभवानंतर कर्णधार रशीद खानने परिस्थितीसमोर हतबल झाल्याचे मान्य करत भावूक पोस्ट केली होती. दुसरीकडे, अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकांना मात्र आजचा पराभव हा ‘अन्यायाचे फळ’ आहे असं वाटतंय. अफगाणिस्तानचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवर टीका केली आहे. इतक्या मोठ्या व महत्त्वाच्या सामन्यासाठी अशा प्रकारची खेळपट्टी साजेशी नाही, असे म्हणत ट्रॉट यांनी आयसीसीला खडेबोल सुनावले. दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याविषयी बोलायचे झाल्यास, ब्रायन लारा क्रिकेट अकादमी स्टेडियमवर झालेल्या या खेळात अफगाणिस्तानचा डाव केवळ ५६ धावांत गुंडाळला गेला. ही टी २० विश्वचषक उपांत्य फेरीतील सर्वात कमी धावसंख्या ठरली.

ट्रॉट यांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण आफ्रिकेने ८.५ षटकात अफगाणिस्तानने दिलेलं ५७ धावांचं आव्हान पूर्ण केलं असलं तरी या खेळपट्टीवर त्यांना सुद्धा अडचणींचा सामना करावा लागलाच. “पाहायला गेलं तर, ५७ धावांचा पाठलाग करताना त्यांनाही कठीणच गेलं. याचं कारण म्हणजे खेळपट्टीवरुन मिळणारा अतिरिक्त स्विंग आणि चेंडूला मिळणारी अनियमित उसळी यामुळे सेमी फायनलसाठीची खेळपट्ची ही गोलंदाजांना झुकतं माप देणारी होती”, असं अफगाणिस्तानचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी म्हटलं आहे.

Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”
russia ukraine war
Russia Ukraine War : युद्ध थांबविण्यासाठी झेलेन्स्की तयार
trump warns Russia marathi news
Donald Trump : रशियावर निर्बंध लादण्याचा ट्रम्प यांचा इशारा

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ट्रॉट म्हणाले की, “मला स्वतःला अडचणीत आणायचे नाही किंवा ‘कोल्ह्याला द्राक्ष आंबट’ अशा म्हणीचं उदाहरणही व्हायचं नाही. परंतु विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी योग्य अशी ही खेळपट्टी नक्कीच नाही. हे माझं साधं सरळ मत आहे.”

इंग्लंडच्या माजी फलंदाजाने ही खेळपट्टी फलंदाजीची लय पूर्णपणे बिघडवणारी होती असेही म्हटले. “ही स्पर्धा सर्वांसाठी न्यायकारक असायला हवी होती. मी असं म्हणणार नाही की खेळपट्टीवर चेंडू स्पिन किंवा सीम होऊ नये, पीच पूर्णपणे सपाट हवी. पण माझं एवढंच म्हणणं आहे की खेळपट्टीवर हालचाल करताना, पुढे जाताना फलंदाजाला भीती नसावी. पायांची हालचाल करताना विश्वास वाटायला हवा, तरच ते शॉट खेळू शकतील, त्यांचं कौशल्य दाखवू शकतील. टी २० मध्ये मुळातच आक्रमक खेळ अपेक्षित आहे. पटापट धावा करणे, विकेट्स घेणे हा या खेळाचा फॉरमॅट आहे, इथे पीचवर टिकूनच राहायचंय हा विचार केला जात नाही.”

हे ही वाचा<< ५६ धावांसह अफगाणिस्तान विश्वचषकातून बाहेर! भावूक होत कर्णधार रशीद खान म्हणाला, “चांगली कामगिरी करता आली असती..”

दरम्यान, न्यूयॉर्कमधील खेळपट्ट्या या गोलंदाजांना झुकतं माप देतात यावरून आधीही बरीच टीका झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, या ठिकाणी झालेल्या पाच विश्वचषक सामन्यांपैकी फक्त एकदाच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला १०० धावांचा टप्पा पार करता आला होता. ही दुर्मिळ कामगिरी करण्याचा रेकॉर्ड वेस्ट इंडिजच्या नावे आहे ज्यांनी न्यूझीलंडविरुद्ध सहा बाद १४९ धावा केल्या होत्या व नंतर सामना सुद्धा जिंकला होता.

Story img Loader