Afghanistan vs Australia T20 World Cup 2024 : अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना असला की क्रिकेट चाहत्यांना पर्वणी मिळावी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ६ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आययीसी एकदिवसीय विश्वचषकाचा तो सामना कुणीही विसरलेले नाही. विजयाच्या दारात उभ्या असलेल्या अफगाणिस्तानच्या संघाला एकट्या ग्लेन मॅक्सवेलने २०१ धावांची तडाखेबाज खेळी करून हुसकावून लावलं होतं. त्या पराभवाचे उट्टे आठ महिन्यांच्या आत अफगाणिस्तानने काढले आहेत. तेही आयसीसीच्या मालिकेतच, हे विशेष. अफगाणिस्तानच्या आजच्या विजयामागे भूतकाळातील पराभव आणि ‘त्या’ अपमानाचीही किनार आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ क्रिकेट खेळण्यात पारंगत असला तरी इतर देशांतील मानवाधिकार कायद्याची परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था याबाबतही जागृत असतो. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट लागू झाल्यानंतर महिलांवरील अत्याचाऱ्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. मानवाधिकार कायद्यांचे उल्लंघन केले गेले. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने तीन वेळा अफगाणिस्तानशी क्रिकेट खेळण्यास विरोध केला होता. यावर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानमध्ये होणारी मालिकाही ऑस्ट्रेलियाने रद्द केली.

Afghanistan beats australia by 21 runs in Marathi
Afghanistan vs Australia Highlights : अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय; गुलबदीन ठरला शिल्पकार
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
AUS vs AFG match memes viral on social media
VIDEO : अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर मीम्सचा महापूर, नेटकऱ्यांनी मॅक्सवेलची अंडरडेकरशी केली तुलना
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Gulbadin Naib Faking Injury to Waste Time
AFG v BAN: ‘हळू खेळा, पाऊस येतोय’, अफगाणिस्तानच्या कोचचा इशारा आणि गुलबदीन पाय पकडून खाली पडला… पाहा VIDEO
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…

AUS vs AFG : अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय; गुलबदीन ठरला शिल्पकार

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार रशीद खानने ऑस्ट्रेलियाच्या नकारानंतर काहीशी नाराजी व्यक्त केली होती. ऑस्ट्रेलियाने आमच्या भूमीवर क्रिकेट खेळण्यास नकार देऊन अफगाणी जनतेचा आनंद हिरावून घेतला आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया देऊन रशीदने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. आयपीएलसाठी भारतात आल्यानंतर पीटीआयशी बोलताना रशीद म्हणाला होता, “क्रिकेट अशी गोष्ट आहे की, ज्यातून आमच्या लोकांना आनंद मिळत आहे. त्यामुळे मी आणि माझा संघ क्रिकेट खेळतो. तुम्ही जर क्रिकेट खेळण्यास नकार देत असाल तर आमच्या लोकांनी कोणत्या गोष्टीत आनंद साजरा करावा?”

ऑस्ट्रेलियाने तीनवेळा खेळण्यास नकार दिला

ऑगस्ट २०२४ मध्ये अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात तीन टी२० सामन्यांची मालिका होणार होती. मात्र अफगाणिस्तानमध्ये महिला आणि मुलींवरील अत्याचार वाढल्याचे कारण देऊन क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला. आतापर्यंत तीन वेळा हे प्रसंग घडले आहेत. सप्टेंबर २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये अफगाणिस्तान वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा एक कसोटी सामना रद्द करण्यात आला. २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ आखाती देशांत अफगाणिस्तानविरोधात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार होता. मात्र तीही मालिका रद्द करण्यात आली. त्यानंतर यावर्षी अफगाणिस्तानातच होणारी टी-२० मालिका रद्द केली.

आजच्या सामन्यात काय झालं?

किंग्सटाउन येथे खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकात आज पुन्हा एकदा अफगाणिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाला भिडला. जुने पराभव आणि अपमानाचे उट्टे काढत पठाणी खेळाडूंनी कांगारूंचा २१ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ६ गडी गमावून १४८ धावा केल्या होत्या. रहमानउल्ला गुरबाजने ६० आणि इब्राहिम झाद्रानने ५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ १९.२. षटकांत १२७ धावांवर गारद झाला.