Users on social media are making fun of Australia by sharing memes : अफगाणिस्तानने टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ सामन्यात ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगज्जेता आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अफगाणिस्तानसाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे होते. हा सामना जिंकून अफगाणिस्तानने उपांत्य फेरीचे दरवाजेही स्वत:साठी खुले ठेवले आहेत. अफगाणिस्तानकडून हरल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाची सोशल मीडियावर खूप खिल्ली उडवली जात आहे. सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल –

आपला संघ अफगाणिस्तानसारख्या कमकुवत संघाकडून हरेल यावर ऑस्ट्रेलियन चाहत्यांना विश्वास बसत नाही. तर दुसरीकडे अफगाणिस्तानच्या विजयामुळे सोशल मीडियावर वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानच्या विजयाने जगभरातील करोडो चाहते आनंदी दिसत आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे.

अफगाणिस्तानने २१ धावांनी नोंदवला ऐतिहासिक विजय –

या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १४८ धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. सुरुवातीला कांगारू संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी हे लक्ष्य कांगारू संघासाठी अतिशय कठीण केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ १९.२ षटकांत १२७ धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियासाठी ग्लेन मॅक्सवेलने ५९ धावांची स्फोटक खेळी खेळली पण तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

हेही वाचा – AUS vs AFG : अफगाणिस्तानचा विजय ऑस्ट्रेलियाच्या मुळावर? टीम इंडिया सेमी फायनलमध्ये जाणार? काय झालंय नेमकं समीकरण?

या सामन्यात अफगाणिस्तानकडून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. या सामन्यात कर्णधार रशीद खानच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक केली. ज्यामध्ये गुलबदिन नईबने अत्यंत अप्रतिम गोलंदाजी केली. गुलबदिनने ४ षटकात फक्त २० धावा देत ४ विकेट्स घेत अफगाणिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. त्याच्याव्यतिरिक्त नवीन-उल-हकनेही अप्रतिम गोलंदाजी केली. नवीनने ४ षटकात २० धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – AFG vs AUS : ग्लेन मॅक्सवेलचा झेल ठरला अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयाचा ‘टर्निंग पॉइंट’, VIDEO होतोय व्हायरल

ग्लेन मॅक्सवेलचा कॅच ठरला सामन्याच्या टर्निंग पॉइंट –

या सामन्यात जोपर्यंत ग्लेन मॅक्सवेल खेळपट्टीवर ठाण मांडून होता, तोपर्यंत अफगाणिस्तान संघ विजय मिळवू शकेल, असे कोणालाच वाटत नव्हते. मात्र ऑस्ट्रेलियाला १५ व्या षटकात १०६ धावांवर सहावा धक्का ग्लेन मॅक्सवेलच्या रुपाने मोठा धक्का बसला. ग्लेन मॅक्सवेल ४१ चेंडूत ५९ धावा करून बाद झाला. गुलबदिन नईबने त्याला नूरकरवी झेलबाद केले. अफगाणिस्तान संघासाठी या सामन्यात गुलबदिन नईबने लक्षवेधक कामगिरी केली. या गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाच्या स्फोटक फलंदाजांना एकामागून एक पॅव्हेलियनमध्ये परत पाठवण्यास सुरुवात केली. नायबने ४ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात सर्वात मोठी भूमिका बजावली.