Pakistan Team Army Training Video viral : टी-२० विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाची सुरुवात खूपच खराब झाली आहे. संघाला पहिल्याच सामन्यात अमेरिकेसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध सुपर ओव्हर्समध्ये ५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघाच्या लष्करासोबतच्या प्रशिक्षणाची बरीच चर्चा झाली होती. खेळाडूंनी पाकिस्तानी लष्करासोबत मोठ्या प्रमाणावर सराव केला होता, मात्र विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पाणिपत झाले आणि त्यांचे सर्व प्रशिक्षण व्यर्थ गेले. त्यानंतर आता पाकिस्तानी संघाच्या आर्मी ट्रेनिंगची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. पाकिस्तान संघाचा पुढील सामना भारताविरुद्ध होणार आहे. त्यामुळे या सामन्यात तरी पाकिस्तानला आर्मी कॅम्पमधील ट्रेनिंग तारणार का?
सुमारे ३ महिन्यांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचे क्रिकेटपटू पाकिस्तानी लष्करासोबत प्रशिक्षण घेत होते. यावेळी पाकिस्तानी क्रिकेटपटूही स्नायपर शूटिंग करत होते. वास्तविक, टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तानी संघाचा फिटनेस वाढवण्यासाठी पीसीबीने हा निर्णय घेतला होता. मात्र, टी-20 विश्वचषकात या प्रशिक्षणाचा काही उपयोग झाला नाही. ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता पाकिस्तान संघाच्या आर्मी कॅम्पमधील ट्रेनिंगची खिल्ली उडवली जात आहे.
आता पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षणाचे व्हिडीओ शेअर करुन चाहते खिल्ली उडवत आहे. ट्रेनिंगचा व्हिडीओ शेअर करताना एका युजरने लिहिले की, पाकिस्तान क्रिकेट टीम टी-२० वर्ल्ड कपपूर्वी आर्मी कॅम्पमध्ये ट्रेनिंग घेत होती… नक्की हे अमेरिकेला क्रिकेट खेळण्यासाठी आले आहेत ना?
हेही वाचा – IND vs PAK : रोहितला आऊट करण्याच्या रणनीतीबद्दल आमिरचा मोठा खुलासा; म्हणाला, “त्याला फक्त…”
दुसरीकडे, पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षणाचा आणखी एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी खेळाडू वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना एका यूजरने लिहिले की, हे प्रशिक्षणच पाकिस्तान संघासाठी सर्वात जास्त उपयुक्त ठरणार आहे.
हेही वाचा – T20 World Cup 2024 : IND vs PAK सामन्यात नाणेफेकीचा कौल ठरणार निर्णायक, काय आहे कारण जाणून घ्या इतिहास?
पाकिस्तानचा सुपर-८ साठीचा मार्ग खडतर –
अमेरिकेकडून पराभूत झाल्यानंतर सुपर-८ मधील पाकिस्तानचा मार्ग थोडा कठीण झाला आहे. पाकिस्तानचा पुढचा सामना टीम इंडियाशी आहे. टीम इंडियासमोर पाकिस्तानचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान संघाला विजय मिळवणे तितके सोपे नसेल. सुपर-८ मध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला किमान २ सामने जिंकावे लागतील. त्यामुळे आता पाकिस्तानला आर्मी कॅम्पमध्ये ट्रेनिंग भारताविरुद्ध तरी तारणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.