Irfan Pathan emotional after Team India’s win T20 World Cup 2024 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं आहे. त्याचबरोबर भारतीय संघाने ११ वर्षांपासून चालत आलेला आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळही संपवला. २००७ मध्ये भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या हंगामात धोनीच्या नेतृत्त्वाखाली ट्रॉफी जिंकली होती. आता भारताच्या विजयानंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण भावूक झाला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवून इतिहास रचला. या स्पर्धेत एकही सामना न गमावता जेतेपदावर कब्जा करणारा टीम इंडिया पहिला संघ ठरला आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीचे अर्धशतक आणि अक्षर पटेलच्या ४७ धावांच्या जोरावर ७ गडी गमावून १७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ ८ गड्यांच्या मोबदल्यात १६९ धावाच करू शकला. भारताच्या विजयानंतर समालोचन करताना इरफान पठाण भावूक झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर सूर्यकुमार यादवच्या झेलचे विशेष आभार मानले.

२००७ मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग असलेला भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू या विजयानंतर भावूक झाला. समालोचन करताना त्याला हुंदका दाटून आला होता, ज्यामुळे त्याचा आवाज बाहेर येणे कठीण झाले होते. भारतीय संघाच्या विजयाच्या आनंदाने या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित प्रत्येक माजी भारतीय क्रिकेटपटू भावूक झाला होता. सर्वांचे मन आनंदाने भरून आले आणि काहींच्या डोळ्यात अश्रूही आले.

हेही वाचा – IND vs SA : “फायनल पाहताना माझे हृदयाचे ठोके वाढले होते अन्…”, टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाचे केले कौतुक

एमएस धोनीकडून रोहित शर्माच्या संघाचे कौतुक –

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना लिहले, “टीम इंडिया विश्वविजेते! फायनल पाहताना माझे हृदयाचे ठोके वाढले होते. दडपणाच्या स्थितीत शांत राहून, स्वत:च्या कौशल्यांवर विश्वास ठेऊन तुम्ही विजयश्री खेचून आणलीत. याकरता तुमचं मनापासून अभिनंदन. वर्ल्डकप पुन्हा भारतात आणल्याबद्दल समस्त भारतीयांच्या वतीने धन्यवाद आणि खूप शुभेच्छा!”

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After india won the t20 wc for 2nd time video of irfan pathan getting emotional and praising suryakumar has gone viral vbm