Virat Kohli going to London for meet family airport video viral : स्टार फलंदाज विराट कोहली टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियासह बार्बाडोस येथून १७ तासांच्या हवाई प्रवासानंतर गुरुवारी ४ जुलै रोजी सकाळी भारतात परतला. १६ तासांच्या प्रवासानंतर आणि संपूर्ण दिवस टीम इंडियासह विजय साजरा केल्यानंतर विराट कोहली अचानक लंडनला रवाना झाला. मुंबई ते लंडन फ्लाइटची सरासरी वेळ १० तास आहे. टी-२० विश्वचषक विजयाचे सेलिब्रेशन संपल्यानंतर विराट कोहली पुन्हा एकदा मुंबई विमानतळावर दिसला. विराट कोहली ऑलिव्ह ग्रीन जॅकेट आणि पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहली आराम न करता एवढ्या घाईत लंडनला का जात आहे, असा सवाल सोशल मीडियावर चाहत्यांनी केला. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि त्याची दोन मुले सध्या लंडनमध्ये आहेत. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिने यावर्षी फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या मुलाचे नाव अकाय ठेवले आहे. दुसऱ्या मुलाच्या जन्मावेळी विराट कोहली पत्नी अनुष्का शर्माबरोबर लंडनमध्ये उपस्थित होता.

Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
How Prize Money will be Divided
टीम इंडियात बक्षिसाच्या १२५ कोटी रुपयांच्या रकमेचे वितरण कसे होणार? टॅक्समध्ये किती पैसे कापले जातील? जाणून घ्या
Natasa Shares Cryptic Video As Hardik Pandya Returns
हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने टीम इंडिया भारतात येताच केलेली पोस्ट पाहून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; लिहिलं, “तेव्हा माझं रक्षण..”
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Rohit sharma grand welcome at home
VIDEO: जगज्जेत्या कर्णधाराचं घरी साजेसं स्वागत; बालपणीच्या मित्रांनी केला सॅल्युट, फुलांनी सजवलं घर
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Rohit Pawar Ashish Shelar Video
Video: रोहित पवारांसाठी भाजपाचे आशिष शेलार रोहित शर्माच्या मागे धावले; वानखेडेवर काय घडलं?
Team India to Meet PM Narendra Modi Highlights
Team India Victory Parade Highlights: बीसीसीआयने टीम इंडियाला दिला १२५ कोटींचा चेक, विराट-रोहित झाले भावुक

विराट कोहली बऱ्याच दिवसांनी कुटुंबियांना भेटणार –

विराट कोहलीचे कुटुंब अजूनही लंडनमध्ये आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीने विलंब न करता लंडनला रवाना होण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि तिची दोन मुले २०२४ च्या टी-२० विश्वचषकादरम्यान लंडनमध्ये होती. विराट कोहली टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये त्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे बराच काळ आपल्या कुटुंबापासून दूर होता. मात्र, आता वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर विराट कोहली कुटुंबासह विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी उत्सुक आहे.

हेही वाचा – टीम इंडियात १२५ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेचे वितरण कसे होणार? कोणाला किती मिळणार पैसे? जाणून घ्या

विराट कोहली टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त –

मुंबईतील मरीन ड्राइव्हवर विजयाची परेड आणि वानखेडे स्टेडियमवर विजयाचा जल्लोष साजरा केल्यानंतर विराट कोहलीने लंडनला रवाना होण्याचा बेत आखला. विराट कोहलीने आता टी-२० इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतली आहे. विराट कोहलीने १२५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४८.७० च्या सरासरीने ४१८८ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने या काळात एक शतक आणि ३८ अर्धशतके झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या १२२ धावा आहे.