टी२० विश्वचषकातील भारताची मोहीम संपली आहे. सेमीफायनलमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा १० गडी राखून पराभव केला. आता १३ नोव्हेंबरला टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तान आणि इंग्लंडचे संघ मेलबर्नमध्ये आमनेसामने येणार आहेत. टी२० विश्वचषकानंतर आता भारतीय संघाला न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१८ नोव्हेंबरपासून न्यूझीलंड मालिका सुरू होत आहे. या मालिकेत तीन टी२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, आता मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक आणि माजी अनुभवी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण हे टीम इंडियाच्या कार्यवाहक मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारतील.

मुख्य प्रशिक्षक द्रविड आणि वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, द्रविड तसेच त्याच्या संपूर्ण प्रशिक्षक कर्मचाऱ्यांना टी२० विश्वचषकानंतर विश्रांती देण्यात आली आहे. त्यात गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांचाही समावेश आहे. भारतीय संघ १८ नोव्हेंबर रोजी वेलिंग्टन येथे तीन सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि अश्विन या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच, आता मुख्य प्रशिक्षक सपोर्ट स्टाफ मधील काही सदस्यांना देखील या दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे.

हेही वाचा :   T20 World Cup 2022: ‘भारतीय संघात टॅलेंटची कमी नाही पण व्हाईट बॉल…’ मायकेल वॉर्नने सांगितले पराभवाचे कारण

व्ही.व्ही. एस लक्ष्मण प्रशिक्षकाची भूमिका निभावणार

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले, “लक्ष्मणच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय क्रिकेट अकादमी संघ न्यूझीलंडमध्ये संघात सामील होईल. यामध्ये हृषीकेश कानिटकर फलंदाजी प्रशिक्षक आणि साईराज बहुतुले गोलंदाजी प्रशिक्षक यांचा समावेश असणार आहे. व्ही.व्ही. एस लक्ष्मण टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तो झिम्बाब्वे आणि आयर्लंड दौऱ्यावरही टीम इंडियाचे प्रशिक्षक राहिले होता. अलीकडेच तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारत दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतही टीम इंडियासोबत होता.

हेही वाचा : T20 World Cup 2022: पाकिस्तान-इंग्लंड अंतिम सामन्यात पाऊस ठरणार का व्हिलन? जाणून घ्या

न्यूझीलंड दौऱ्यावर हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या टी२० मालिकेत हार्दिक पांड्या टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर शिखर धवन वनडे मालिकेत कर्णधार असेल. रोहित शर्मासह इतर दिग्गज खेळाडू पुढील महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर टीम इंडियात परतणार आहेत. टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय खेळाडूंनी पुनरागमन करण्यास सुरुवात केली आहे. कोहली आधीच ॲडलेडहून निघून गेला आहे. त्याचवेळी रोहित आणि राहुलही लवकरच भारताला रवाना होणार आहेत.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the t20 world cup rahul dravid rested for new zealand tour vvs laxman will be the coach of team india on the tour of new zealand avw
Show comments