Ajay Jadeja Refused to Fees From Afganistan in ODI World Cup: भारतात २०२३ मध्ये झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने कौतुकास्पद कामगिरी केली होती. त्या वर्ल्डकपपासून ते टी-२० विश्वचषकापर्यंत संघातील प्रत्येक खेळाडूने मेहनत घेत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानचा पराभव करत मोठा अपसेट घडवला. पण अफगाणिस्तान संघाच्या या प्रगतीमध्ये खेळाडूंच्या मेहनतीसोबतच भारताच्या या माजी खेळाडूचाही वाटा आहे. वनडे विश्वचषक २०२३ मध्ये अफगाणिस्तान संघाचे मार्गदर्शक असलेल्या अजय जडेजा यांनी या भूमिकेसाठी क्रिकेट बोर्डाकडून एक रूपयाही न घेतल्याची माहिती समोर आली.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे सीईओ यांनी एका मुलाखतीत सांगितले की, अजय जडेजाने अफगाणिस्तान संघात सामील होण्यासाठी एक रुपयाही फी घेतली नाही. अजय जडेजा म्हणाले की, तुम्ही चांगले खेळा हीच माझी फी असेल आणि तेच माझे बक्षीस असेल. अजय जडेजा मीडियासमोर याविषयी कधीच काही बोलला नसले तरी त्यांनी हे जे काही केले ते कौतुकास्पद आहे.
अजय जडेजा यांच्याबद्दल सांगताना अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नसीब खान म्हणाले, “वनडे विश्वचषक २०२३ साठी संघामध्ये त्यांच्या भूमिकेसाठी आम्ही अनेकवेळा त्यांना मानधन घेण्याचा आग्रह केला. पण त्यांनी एकही रूपया घेण्यास नकार दिला. यावर त्यांची प्रतिक्रिया होती, तुम्ही चांगलं खेळा, जिंका हीच माझी गुरुदक्षिणा असेल.”
ACB CEO said that Ajay Jadeja refused to take any money from the Afghanistan Cricket board for his services during the ODI World Cup 2023 as he told "If you play well, that's all the money & reward I need". [Ariana News]
— Johns. (@CricCrazyJohns) June 14, 2024
– Ajay Jadeja, Massive respect ? pic.twitter.com/MuCwOx8Hne
अफगाणिस्तान क्रिकेटच्या विकासात बीसीसीआयने मोठे योगदान दिले आहे. BCCI ने अफगाणिस्तान संघाला सराव करण्यासाठी आणि क्रिकेट खेळण्यासाठी भारतात एक स्टेडियम उपलब्ध करून दिले आहे. यानंतर आता अफगाणिस्तान आज जागतिक क्रिकेटमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे.
अफगाणिस्तान संघाचा यंदाच्या टी-२० विश्वचषकातील प्रवास शानदार राहिला आहे. अफगाणिस्तानने खेळलेल्या ३ पैकी तीनही सामने जिंकून सुपर८ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. क गटात अफगाणिस्तानसोबतच वेस्ट इंडिजचा संघही सुपर८ साठी पात्र ठरण्यात यशस्वी ठरला आहे. आतापर्यंत भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ सुपर८ साठी पात्र ठरण्यात यशस्वी ठरले आहेत.