आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची बॅट सध्या धुमाकूळ घालत आहे. सूर्यकुमारने रविवारीही अत्यंत कठीण काळात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीसमोर ६८ धावांची धडाकेबाज खेळी केली. पण भारतीय संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. कारण इतर फलंदाज फ्लॉप ठरल्याने, भारताला दक्षिण आफ्रिकेकडून ५ विकेट्सने पराभव पत्कारावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सूर्यकुमार यादवने ४० चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले. ३१ वर्षीय सूर्याच्या या खेळीमुळे भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर ९ बाद १३३ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. सूर्याने एकट्याने ६८ धावा केल्या. त्याचबरोबर १३४ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने १९.४ षटकांत ५ गडी गमावत १३७ धावा करत पूर्ण केले.

सध्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्या सध्या चमकत असला तरी, त्याला भारतीय संघात पदार्पण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. बऱ्याचवेळा निवड समितीने सूर्याने चांगली कामगिरी करुन सुद्धधा त्याच्याकडे दुर्लक्ष केले. अशा काळात त्याला त्याचे चाहते आणि इतर लोकं विचारायची सूर्या तुझी कामगिरी चांगली असून देखील निवड का होत नाही.

त्यावेळी सूर्या स्वत;ला आणि त्यांना समजायवयचा की, अपना टाइम आयेगा. विशेष म्हणजे हेच गाणे तो रुममध्ये असताना ऐकायचा. त्याला हे गाणं प्रचंड आवडायचं, असे त्याने एका मुलाखतीत सुद्धा सांगितले आहे. त्याचबरोबर त्याला बॉलिवूडचे काही सिनेमे सुद्धा त्याला आवडतात.

त्याचे मित्र त्याच्या केसांच्या आणि घड्याळांच्या रंगाची खिल्ली उडवत असत. त्याची पत्नी देविशाने अलीकडेच सांगितले की, तो कसा जुना चित्रपट रिवाइंड करतो आणि मोठ्याने हसतो. त्याला कॉमिक चित्रपट आणि हेरा फेरी आणि द कपिल शर्मा शो सारखे शो आवडतात. तसेच त्याला सिंघमच चित्रपटातील लोकप्रिय ‘नॉनसेन्स’ ही ओळ त्याची आवडती आहे.

तसेच त्याच्या संघर्षाच्या काळाच्यादरम्यान, तो दोन गोष्टी करत राहिला: धावा करणे आणि त्याच्या मित्रांना आणि कुटुंबियांना मदत करणे. जेव्हा महामारीचा प्रसार सुरु झाला तेव्हा देखील सूर्याने आपल्या मित्रांना मदत केली. तसेच आपल्या मित्रांच्या मदतीसाठी तो नेहमीच हजर असतो.

हेही वाचा – IND vs SA: टीम इंडियाचा तळपता सूर्या! सूर्यकुमार यादवने सांगितलं तुफानी खेळीचं गुपित, म्हणाला, “मी रबरी बॉल..”