Atiq Uz Zaman raised questions on Pakistan team and PCB : टी-२० विश्वचषक २०२४ च्या स्पर्धेतील सुपर ८ फेरीपूर्वी पाकिस्तानचा संघ बाहेर पडल्याने मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाने ग्रुप स्टेजमधील ४ पैकी फक्त २ सामने जिंकू शकला होता. यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. अलीकडेच एका चाहत्याने पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ याच्याशी गैरवर्तन केले, त्यानंतर हारिस त्याला मारण्यासाठी धावला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला. आता माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू अतिक उझ जमानने या प्रकरणावर संपूर्ण पाकिस्तान संघाला फटकारले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी खेळाडूची पाकिस्तान संघावर टीका –

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अतिक उझ जमान याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्याने पाकिस्तानी खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबीयांना आयसीसीच्या कार्यक्रमात पाठवल्याबद्दल पीसीबीवर नाराजी व्यक्त केली आहे. अतितने व्हिडिओमध्ये सांगितले की, आमच्या काळात संघासोबत प्रशिक्षक आणि व्यवस्थापक असायचे आणि संघ चालवला जायचा. आता खेळण्यापेक्षा जास्त ड्रामा केला जात आहे. आताचे संघात १७ खेळाडू आहेत आणि त्यांच्यासाठी ६० रुम्स बुक केल्या होत्या. तुम्ही तिथे क्रिकेट खेळायला गेला आहात की सुट्टीसाठी? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

पाकिस्तानच्या खेळाडूंबद्दल बोलताना माजी क्रिकेटपटू अतिक उझ जमान म्हणाला, “यार तुम्ही खूप ड्रामा केला आहे, आमच्या काळात प्रशिक्षक असायचे. त्याच्यासोबत एक मॅनेजर असायचा. अशा प्रकारे संघ चालवला जात होता. आता तुम्ही तर संपूर्ण टीम उभा केली आहे. १७ अधिकारी आणि १७ खेळाडू आहेत.” यानंतर त्याने खेळाडू आणि त्यांच्या पत्नीबद्दलही आपले मत मांडले.

हेही वाचा – David Johnson : भारताचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांचे बाल्कनीतून पडून निधन; पोलिसांना आत्महत्येचा संशय?

तुम्ही खेळाडूंबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना का जाऊ देता?

अतिक उझ जमान पुढे म्हणाला, “मी ऐकलं की हॉटेलच्या ६० रुम्स बुक केल्या होत्या. यार हा काय मजाक आहे. तुम्ही तिथे क्रिकेट खेळायला गेला आहात की कुटुंबासोबत सुट्टीवर गेला आहात? तुम्ही तुमच्या कुटुंबाला मोठ्या स्पर्धेत घेऊन का जाता? मी लहान मालिकांमध्ये समजू शकतो.” याबाबत पीसीबीवर संतप्त होऊन अतिक म्हणाला की, तुम्ही खेळाडूंबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना का जाऊ देता?

संघापेक्षा कुटुंबाकडेच जास्त लक्ष –

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अतिक उझ जमान म्हणाला की पाकिस्तानी खेळाडू जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांसोबत क्रिकेट खेळायला जातात, तेव्हा त्यांचे लक्ष क्रिकेटपासून वळते आणि त्यांचे संपूर्ण लक्ष त्यांच्या कुटुंबाकडेच असते. तो पुढे म्हणाला, तुम्हाला पत्नीला बरोबर घेऊन जायची आणि त्यांच्याबरोबर फिरण्याची सवय लागली आहे. हे लोक तेच करतात. ते संध्याकाळी जातात आणि त्यांचे लक्ष क्रिकेटपासून दूर होते. त्यानंतर ते कुटुंब, मुले, पत्नी यावर लक्ष केंद्रित करतात.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atiq uz zaman has slammed pakistan cricket players for taking their wives to icc tournaments vbm