टी-२० विश्वचषक २०२२ मधील ३१ व्या सामन्यात आज गतविजेता ऑस्ट्रेलियाचा सामना आयर्लंडशी होणार आहे. या सामन्याला ब्रिस्बेन येथील गाबा स्टेडियमवर दुपारी १:३० ला सुरुवात होईल. तत्पुर्वी आयर्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान बळकट करण्यासाठी आयर्लंडवर मोठा विजय मिळवण्याकडे कांगारूंचे लक्ष असेल. सध्या तीनपैकी एक सामना जिंकून ऑस्ट्रेलिया -१.५५५ च्या नेट रन रेटसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियातील एक सामना पावसामुळे रद्द केला.

दुसरीकडे, जर आपण आयर्लंडबद्दल बोललो, तर हा संघ तिसऱ्या स्थानावर आहे, ऑस्ट्रेलियापेक्षा एक स्थान वर आहे. ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंडचे प्रत्येकी ३ गुण आहेत, परंतु चांगल्या निव्वळ धावगतीने, आयर्लंड (-१.१७०) कांगारूंपेक्षा पुढे आहे. आजचा सामना हरणारा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडेल.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : दोन्ही संघांना विजय आवश्यक ; ऑस्ट्रेलियापुढे आर्यलडचे आव्हान

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, अॅरॉन फिंच (कर्णधार), मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, अॅडम झम्पा, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड.

आयर्लंड (प्लेइंग इलेव्हन): पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेयर, बॅरी मॅककार्थी, फिओन हँड, जोशुआ लिटल.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : दोन्ही संघांना विजय आवश्यक ; ऑस्ट्रेलियापुढे आर्यलडचे आव्हान

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aus vs ire after winning the toss see irelands bowling decision and the playing xi of both teams vbm