टी-२० विश्वचषक २०२२ मधील ३१ वा सामना आज गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड संघात खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने अॅरॉन फिंचच्या अर्धशतकाच्या जोरावर ५ बाद १७९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आयर्लंड संघासमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यात आयर्लंड संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून १७९ धावा केल्या. ज्यामध्ये कर्णधार अॅरॉन फिंचने संघाकडून सर्वाधिक धावा करताना अर्धशतक झळकावले.
अॅरॉन फिंचने ४४ चेंडूचा सामना करताना, ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २३ धावा केल्या. त्याचबरोबर मार्कस स्टॉयनिस देखील ३५ धावांचे योगदान दिले. या व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला खास खेळी करता आली नाही. आयर्लंड संघाकडून गोलंदाजी करताना बॅरी मॅककार्थीने ३ आणि जोशुआ लिटलने २ बळी घेतले.
बॅरी मॅककार्थीने घातक गोलंदाजी करताना, डेव्हिड वार्नर, अॅरॉन फिंच आणि मिचेल मार्शला या महत्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकांत २९ धावा दिल्या. आता आयर्लंड संघाला विजयासाठी २० षटकांत १८० धावांची गरज आहे.