ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी टी-२० विश्वचषक २०२२च्या ३८ व्या सामन्यात अफगाणिस्तानवर ४ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर संघाने गुणतालिकेत पहिल्या २ मध्ये स्थान पटकावले. मात्र, अजूनही गतविजेत्या संघाच्या नावासमोर क्वालिफिकेशनचे चिन्ह नाही. ऑस्ट्रेलियाला अजूनही वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याचा धोका कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वास्तविक, अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट -०.१७ आहे, तर इंग्लंड +०.५४७ च्या नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. शनिवारी इंग्लंड श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे, या सामन्यातील विजयासह इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा संघ ठरणार आहे. खराब नेट रनरेटमुळे ७ गुण असूनही ऑस्ट्रेलियाला विश्वचषकातून बाहेर पडावे लागू शकते. . दुसरीकडे, इंग्लंडवर श्रीलंकेने मात केल्यास ऑस्ट्रेलिया हा उपांत्य फेरी गाठणारा ग्रुप-१ मधून दुसरा संघ बनेल.

ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान सामन्याबद्धल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकात ८ गडी गमावून १६८ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वधिक नाबाद ५४ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर मिचेल मार्शने ४५, वॉर्नर आणि स्टॉइनिसने प्रत्येकी २५ धावा केल्या. दुसरीकडे अफगाणिस्तानकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : यजमान ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तानवर ४ धावांनी निसटता विजय, राशिद खानची झुंज अपयशी

नेट रनरेटच्या बाबतीत इंग्लंडला मागे टाकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानला १०६ धावांच्या आधीच रोखायचे होते, पण कांगारू संघाला त्यात अपयश आले. १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला २० षटकांत ७ गडी गमावून १६४ धावांपर्यंतच मजल मारता आली. शेवटी राशीद खानने २३ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४८ धावांची तुफानी खेळी केली, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अफगाणिस्तान १३व्या षटकापर्यंत सामन्यात टिकून होता, परंतु झंपाच्या १४व्या षटकात १ धावबादसह एकूण तीन विकेट्स पडल्या, ज्यामुळे सामना ऑस्ट्रेलियाच्या दिशेने वळला.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia on the verge of being out of the t20 world cup despite victory against afghanistan vbm