टी२० विश्वचषक २०२२ या स्पर्धला सुरुवात होऊन तीन दिवस झाले आहेत. परंतु ऑस्ट्रेलिया संघाच्या पाठीमागे लागलेले दुखापतीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. आता जोश इंग्लिस गुरुवारी हाताच्या दुखापतीमुळे टी२० विश्वचषकातून बाहेर पडला. बुधवारी सिडनीमध्ये गोल्फ खेळताना यजमान ऑस्ट्रेलियाचा बॅकअप यष्टिरक्षक इंग्लिसच्या हाताला दुखापत झाली.
ही घटना बुधवारी सकाळी घडली. जेव्हा खेळाडूंना त्यांच्या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण सत्रापूर्वी विश्रांतीसाठी सकाळची विश्रांती देण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाला शनिवारी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर न्यूझीलंडविरुद्ध पहिला टी२० विश्वचषक पूल सामना खेळायचा आहे. इंग्लिस, जो त्याच्या १५ जणांच्या विश्वचषक संघात नियमित यष्टीरक्षक मॅथ्यू वेडसाठी बॅकअप होता. त्याला “सामान्य गोल्फ स्विंग” दरम्यान दुखापत झाली होती, असे त्याच्या काही सहकारी आणि संघाच्या प्रवक्त्याने सांगितले.
इंग्लिसला रुग्णालयात नेण्यात आले असून दुखापतीची तीव्रता अस्पष्ट आहे. संघांनी प्रत्येक संघात फक्त १५ खेळाडूंना परवानगी दिली आहे. त्यामुळे इंग्लिसची अनुपस्थिती ऑस्ट्रेलियन संघासाठी मोठा धक्का असेल.
इंग्लिसच्या दुखापतीमुळे आधीच दुखापतग्रस्त ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणीत भर पडणार आहे. युवा कॅमेरून ग्रीन, आघाडीच्या अष्टपैलू मिचेल मार्श आणि मार्कस स्टॉइनिसच्या तंदुरुस्तीची चिंता आहे. त्याचबरोबर अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला झालेली दुखापत, यामुळे सर्व निवडकर्त्यांना विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे. अगदी अशाच प्रकारचे प्रकरण इंग्लंडचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो याच्यासोबत घडले होते. विश्वचषकासाठी इंग्लंड संघाची घोषणा झाल्यानंतर बेअरस्टो गोल्फ खेळताना पडल्याने दुखापतग्रस्त झाला. ज्यामुळे तो देखील विश्वषक स्पर्धतून बाहेर पडला आहे.