Azam Khan got angry on fans vide viral : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ चा ११ वा सामना अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात डलास येथील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्यांदा हा सामना बरोबरी सुटला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हर्समध्ये अमेरिकेने पाकिस्तानचा ५ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात पाकिस्तानचा आझम खान गोल्डन डकवर आऊट झाला. मात्र, तो आऊट होऊन डगआऊटमध्ये परतत असताना चाहत्यांशी वाद घालताना दिसला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गोल्डन डकवर आऊट झाल्यानंतर आझम खान चाहत्यांशी भिडला –

पाकिस्तानचा फलंदाज आझम खान अमेरिकेविरुद्ध गोल्डन डकवर बाद झाला. मात्र, याआधी इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यातही तो गोल्डन डकचा बळी ठरला होता. आझम खान खराब फॉर्ममधून जात आहेत. त्याचवेळी त्याच्या खराब फिटनेसवर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गोल्डन डकवर आऊट झाल्यानंतर आझम ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात असताना, स्टँडवर उपस्थित असलेल्या चाहत्यांच्या काही कमेंटमुळे तो अचानक संतापला. यानंतर आझमने त्या सर्व चाहत्यांकडे रागाने पाहिले आणि नंतर हाताने काही हावभाव केले. आझम खानच्या या कृतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आझम खान हा पाकिस्तानचा माजी विकेटकीपर मोईन खानचा मुलगा आहे आणि त्यामुळेच त्याच्या निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यामागील एक कारण म्हणजे आझमचा फिटनेस. या विश्वचषकात पाकिस्तान संघात आझम खानचा समावेश केल्यापासूनच अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. आता पहिल्याच सामन्यात या खेळाडूने आपल्या खराब कामगिरीने चाहत्यांची आणि संघाची निराशा केली. यानंतर चाहते सोशल मीडियावर या खेळाडूची खिल्ली उडवत आहेत. त्याचबरोबर मजेशीर मीम्सही शेअर करत आहेत.

हेही वाचा – USA vs PAK Highlights: शोएब अख्तरने लाज काढली, “पाकिस्तान विजय मिळवूच शकत नव्हता, कारण..”

पाकिस्तानसाठी मोहम्मद आमिर ठरला खलनायक –

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने अमेरिकेला १६० धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात अमेरिकेचा संघ १५९ धावाच करु शकला. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला अर्थात टाय झाला. त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये १९ धावांचे लक्ष्य दिले. ज्यानंतर पाकिस्तानला १३ धावाच करता आल्या. सौरभ नेत्रावळकरने सुपर ओव्हरमध्ये विकेट काढल्याने अमेरिकेचा विजय सोपा झाला. या सगळ्यानंतर पाकिस्तान संघाचे चाहते पराभवाचे खापर सुपर ओव्हर टाकणाऱ्या मोहम्मद आमिरवर फोडत आहेत. कारण त्याने या सुपर ओव्हरमध्ये ३ वाइडसह १८ धावा खर्च केल्या.

हेही वाचा – USA vs PAK : ‘भूख लगी थी इसलिए अंडा बना दिया…’, पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूला भोपळाही फोडता न आल्याने चाहत्यांनी उडवली खिल्ली

पुढच्या सामन्यात पाकिस्तानसमोर भारताचे आव्हान –

पाकिस्तान संघाला आता पुढील सामना भारतीय संघाविरुद्ध खेळायचा आहे, जो न्यूयॉर्कच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. पहिला सामना गमावल्यानंतर आता सुपर ८ चा मार्ग पाकिस्तानसाठी खूपच कठीण झाला आहे, ज्यामध्ये त्यांना त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक असेल. २०२१ साली खेळल्या गेलेल्या विश्वचषकात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. अशा प्रकारे टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत पाकिस्तानला भारताला फक्त एकदाच पराभूत करण्यात यश आले आहे. त्यामुळे पुढचा सामना पाकिस्तानसाठी आणखीनच अवघड असणार आहे.