Babar Azam Viral Video: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाची सुरुवात अतिशय लाजिरवाणी झाली आहे. विश्वचषकात पाकिस्तानला त्यांच्या पहिल्याच सामन्यात नवख्या अमेरिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. ६ जून रोजी डल्लासच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा ५ धावांनी पराभव करून या स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला. अमेरिकेने केलेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या कर्णधाराचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. बाबर आझमचा हा व्हीडिओ पाहून पुन्हा एकदा त्याची खिल्ली उडवली जात आहे.

अमेरिकेविरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम खूपच निराश दिसला, तर पत्रकार परिषदेत त्याला इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पत्रकार परिषदेत विचारलेला तो प्रश्न बाबर आझमला समजलाच नाही आणि तो या प्रश्नाचे भलतंच उत्तर दिलं.

Mohammad Rizwan says I want to be the captain of the team not the king
Mohammad Rizwan : ‘मला किंग नव्हे तर…’, पाकिस्तान संघाचा कर्णधार होताच मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य, रोख नेमका कोणाकडे?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Virat Kohli Babar Azam
‘क्रिकेट डिप्लोमसी’ सांधणार भारत-पाकिस्तान संबंध?
Mohammad Amir angry on Ramiz Raja statement after PAK vs ENG Test Series
Mohammad Amir : “आपकी हरकतें…”, रमीझ राजाने शान मसूदला अपमानित करण्याचा प्रयत्न केल्याने मोहम्मद आमिर संतापला, पाहा VIDEO
PCB Announced Pakistan Squad for Australia and Zimbabwe Series Without Captain
Pakistan Cricket Team: पाकिस्तानने कर्णधाराशिवाय केली ४ संघांची अनोखी घोषणा, बाबर, शाहीन आणि नसीमचा या संघात समावेश नाही
Sajid Khan epic reply to reporters video viral
Sajid Khan : ‘आता अल्लाहने मला लूकच असा दिलाय की…’, साजिद खानच्या उत्तराने पत्रकार परिषदेत पिकला एकच हशा, VIDEO व्हायरल
PAK vs ENGPAK vs ENG Pakistan won the Test series at home after 3 years
PAK vs ENG : पाकिस्तानने ३ वर्षांनी मायदेशात जिंकली कसोटी मालिका, साजिद-नोमानच्या जोरावर इंग्लंडचा उडवला धुव्वा
Rishabh Pant Stump Mic Video Goes Viral As He Planned to Out Ajaz Patel with Washington Sundar Backfires IND vs NZ
IND vs NZ: मला काय माहित त्याला हिंदी समजते…”, पंत आणि वॉशिंग्टन सुंदरची योजना फसली; VIDEO मध्ये पाहा काय घडलं?

हेही वाचा – मुंबईचा मराठमोळा इंजिनियर कसा झाला अमेरिकेचा फास्ट बॉलर; आता भारताविरुद्धच परजणार अस्त्रं

बाबर आझमच्या प्रश्नाचं उत्तर ऐकून पोट धरून हसाल….

पाकिस्तानच्या पराभवानंतर पत्रकार परिषदेत पोहोचलेल्या कॅप्टन बाबर आझमला प्रश्न विचारण्यात आला की, अमेरिकेकडून झालेला संघाच्या पराभवाकडे उलटफेर म्हणून बघायचे की अमेरिकेचा संघ तुमच्यापेक्षा चांगला खेळला? असा प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न विचारल्यानंतर बाबरला सुरूवातीला ते काय म्हणाले हे कळलं नाही. तो बाजूला ते नेमके काय म्हणाले हे विचारताना दिसला.

त्यानंतर या प्रश्नाच्या उत्तरात बाबर म्हणाला की होय, मी खूप निराश आहे, या सामन्यातील तिन्ही विभागांमध्ये आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. आम्ही त्यांच्यापेक्षा नक्कीच चांगले आहोत. गोलंदाजीमध्ये आम्हाला या सामन्यात पहिल्या ६ षटकात जास्त विकेट मिळवता आले नाहीत. फिरकीपटूंनी मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेतल्या नाहीत, तर अधिक दबाव वाढतो आणि त्यामुळे आमच्यावरही दबाव येतो. आम्ही या सामन्यात १० षटकांनंतर पुनरागमन केले पण सुपर ओव्हरमध्ये ज्या प्रकारे त्यांनी आमचा पराभव केला त्याचे संपूर्ण श्रेय त्यांना द्यायला हवे.

हेही वाचा – T20 WC 2024: विल्यमसनला अफगाणिस्तानविरूद्ध पराभवाची आधीच होती कल्पना? सामन्यापूर्वी म्हणाला होता….

बाबर आझमच्या या व्हीडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर हा व्हीडिओ शेअर करत त्याच्या उत्तराची चांगलीच खिल्ली उडवली आहे. बाबरला हा प्रश्न न समजल्याने त्याने भलतेच उत्तर दिले आणि पुन्हा एकदा त्याच्या इंग्रजीमुळे त्याची खिल्ली उडवली जात आहे.

या स्पर्धेत पाकिस्तान संघाला आपला पुढचा गट सामना भारताविरुद्ध ९ जून रोजी न्यूयॉर्कच्या मैदानावर खेळायचा आहे. या सामन्यातही जर पाकिस्तानी संघाला पराभवाला सामोरे जावे लागले तर सुपर-८ मध्ये पोहोचणे त्यांच्यासाठी कठीण होईल. भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात आयरिश संघाचा पराभव करून शानदार सुरुवात केली आहे. पाकिस्तानचा संघ सध्या अ गटातील गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा पराभव करत अमेरिकेचा संघ अ गटात थेट पहिल्या स्थानी पोहोचला आहे.