Senior Pak Journalist Accuses Babar Azam Of Match-Fixing: पाकिस्तान क्रिकेट पुन्हा एकदा नव्या वादात सापडले आहे. गेल्या टी-२० विश्वचषकाचा उपविजेता पाकिस्तान संघ स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाहेर पडला. संघाला पहिल्याच सामन्यात अमेरिकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आणि नंतर भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागला. यानंतर, त्यांनी निश्चितपणे कॅनडा आणि आयर्लंडचा पराभव केला परंतु संघ सुपरद८ साठी पात्र होऊ शकला नाही. आता संघाच्या कामगिरीवरून पाकिस्तानवर ताशेरे ओढण्यात येक आहेत आणि याच दरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला आहे. बाबर आझमने अमेरिकेविरुद्धचा सामन्यात फिक्सिंग केल्याचा आरोप होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानच्या अमेरिकेविरुद्धच्या पराभवानंतर बाबर आझमला अमेरिकेकडून महागड्या भेटवस्तू मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार मुबशीर लुकमान यांनी हा आरोप केला आहे. या आरोपांसह त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – T20 WC 2024: अमेरिका जिंकता जिंकता हरली; अँड्रियस गौसची झुंज अपयशी

या व्हिडिओमध्ये लुकमान यांनी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर अमेरिकेविरुद्धचा सामना हरल्यामुळे महागड्या भेटवस्तू मिळाल्याचा आरोप केला आहे. या टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानचा हा पहिलाच सामना होता आणि जो बरोबरीत आल्याने सामन्याचा निर्णय सुपर ओव्हर खेळवून घेण्यात आला आणि पाकिस्तानचा येथे सामना गमवावा लागला.

ऑडी कार, दुबईमध्ये घर मिळाल्याचे बाबरवर मोठे आरोप

अमेरिकेकडून पराभूत झाल्यानंतर आयर्लंडविरुद्धचा निकराचा सामना जिंकल्यानंतर त्यांच्या शंका आणखी वाढल्याचं लुकमान यांनी सांगितलं. लुकमान यांचा दावा आहे की. बाबरला सट्टेबाजांकडून एक ऑडी कार मिळाली आहे, जी तो त्याच्या भावाकडून भेट असल्याचे सांगत आहे. त्यांनी सांगितले की बाबरची ऑडी ई-ट्रॉन, जी त्याने त्याला त्याच्या भावाने भेट म्हणून दिली होती, ती संशयास्पद बुकींकडून विकत घेतली होती, तर त्याला ऑस्ट्रेलिया आणि दुबईमध्ये अपार्टमेंट देखील मिळाले होते.

हेही वाचा – रोहित-विराटचा संदर्भ देत भारताचा कोच होणाऱ्या गंभीरला माजी खेळाडूने दिला इशारा, म्हणाले; “संघातले बरेचसे खेळाडू…”

व्हायरल व्हिडीओमध्ये मुबशीर लुकमान म्हणत असल्याचे दिसत आहे, ‘काही दिवसांपूर्वी मी पाहिले की बाबरकडे ऑडी ई-ट्रॉन कार आहे. जी खूप चांगली कार आहे. बाबर आझम म्हणाला की, माझ्या भावाने ही कार दिली आहे. तेव्हा मला वाटले की बाबरचा भाऊ काही मोठे काम करत असेल जेणेकरून तो ७-८ कोटी रुपयांची कार गिफ्ट करत आहे. पण मी चौकशी केली असता बाबरचा भाऊ असे कोणतेही काम करत नसल्याचे कळले.’

मुबशीर पुढे म्हणाले, “मग मला प्रश्न पडला की ही कार (ऑडी) कुठून आली? अमेरिकेत हरलो तर कार येणार नाही. जर तुम्ही अफगाणिस्तानकडून हरलात, नेदरलँडकडून हरलात, आयर्लंडकडून हरलात, तर DHA मध्ये घरी मिळणार नाही. तुम्हाला ऑस्ट्रेलियात प्लॉट, दुबईत अपार्टमेंट मिळणार नाहीत… मग कोणाला मिळणार?” असे म्हणत पाकिस्तानच्या ज्येष्ठ पत्रकाराने संघावर ताशेरे ओढले. याचसोबत पुढे बोलताना त्यांनी शाहीन शाह आफ्रिदीवरही टीका केली.

हेही वाचा – ‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”

क्रिक मेट नावाच्या युजरने लुकमान यांचा हा व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये ते बाबर आझमवर हे गंभीर आरोप करत आहे. हा व्हीडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट संघ चर्चेचा विषय ठरला आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babar azam match fixing accusation by senior pak journalist video viral after pakistan flop show in t20 world cup 2024 bdg
Show comments