T20 World Cup Finals: T20 विश्वचषक स्पर्धेत ऐन मोक्याच्या वेळी फॉर्ममध्ये येऊन पाकिस्तान हा अंतिम फेरीत पोहोचलेला प्रथम संघ ठरला आहे. न्यूझीलँडच्या समोर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम व टी २० स्पर्धेतील टॉपचा फलंदाज मोहम्मद रिझवान यांनी न्यूझीलँडच्या गोलंदाजांची धुलाईच केली होती. एकत्रफी ठरलेल्या या सामन्यात न्यूझीलँडला हरवून पाकिस्तानने पाच गाडी राखून विजय मिळवला. यंदाच्या विश्वचषकात अशी एक परिस्थिती होती जेव्हा पाकिस्तान शून्य विजयांसह स्पर्चेतून बाहेर पडण्याची शक्यता होती तिथून बाबर आझमच्या संघाने हे यश खेचून आणले आहे, अर्थात यामुळे आझमचे जगभरातून कौतुक होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मिश्किल अंदाजात आझमचं कौतुक केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बाबर आझमचा संघ आपल्या प्रतिस्पर्ध्याची वाट पाहत असताना दुसरीकडे चाहत्यांनी बाबर आझम आणि इमरान खान यांची तुलना सुरु केली आहे. जर बाबरने टी २० विश्वचषकाची ट्रॉफी पाकिस्तानात आणली तर भविष्यात तो पंतप्रधान होणार असेही भाकीत काहींनी केले आहे. या चर्चांमध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही बाबर आझमला कोपरखळी मारली आहे.

सुनील गावस्कर म्हणाले की, “जर पाकिस्तानने विश्वचषक जिंकला तर 2048 मध्ये बाबर आझम पाकिस्तानचा पंतप्रधान होईल,” गावस्कर यांनी भारत विरुद्ध इंग्लंड अशा दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीपूर्वी स्टार स्पोर्ट्सवरील चर्चेत असे विधान केले आहे. गावस्कर यांची मिश्किल भविष्यवाणी ऐकताच पॅनेलचे सदस्य, शेन वॉटसन आणि मायकेल आथर्टन यांच्यात हशा पिकला होता.

IND vs PAK झालं तर इंडियाची अशी…पाकिस्तानी ‘सुंदरी’ने दिलं आव्हान; Accent ऐकून भारतीय फॅन झाले लोटपोट

टी २० विश्वचषकात पाकिस्तानच्या विरुद्ध कोण खेळणार हे आजच्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात ठरणार आहे. अनेकांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामना व्हावा अशी इच्छा आहे तर काहींनी पाकिस्तान व इंग्लंड मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भिडतील असे अंदाज वर्तवले आहेत. यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानला तब्बल ३० वर्षांनंतर ज्या ठिकाणी पहिला विश्वचषक जिंकला त्याच मैदानात पुन्हा यशाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे.