Bangladesh vs Netherlands T20 World Cup 2024 Highlights: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स सामन्यात एक विचित्र घटना घडली. नाणेफेक जिंकल्यानंतर नेदरलँड्सने बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दरम्यान, डच संघाचा व्हिव्हियन किंग्मा गोलंदाजी करत असताना त्याचा एक चेंडू बांगलादेशचा सलामीवीर तनजीद हसनच्या हेल्मेटच्या ग्रिलमध्ये जाऊन अडकला. या बाऊन्सर चेंडूवर फलंदाजाला दुखापत होऊ शकली असती, मात्र हेल्मेटच्या ग्रीलमुळे मोठी दुर्घटना टळली.

बांगलादेशच्या डावाच्या तिसऱ्या षटकात ही घटना घडली, जेव्हा विवियन किंग्मा डच संघासाठी गोलंदाजी करण्यासाठी आला होता. किंग्माने षटकातील पहिल्या ४ चेंडूत १४ धावा दिल्या होत्या, परंतु त्याच दरम्यान त्याने पाचव्या चेंडूवर बाउन्सर टाकला. ताशी १३४ किमी वेगाने येणाऱ्या बाउन्सर चेंडूवर पुल शॉटसाठी तनजीदने बॅट फिरवली, पण चेंडू त्याच्या हेल्मेटच्या ग्रिलमध्ये जाऊन अडकला. जेव्हा रिप्ले दाखवला गेले तेव्हा दिसले की टप्पा पडल्यानंतर चेंडू खूप जोरात बाऊन्स झाला.

batsman jemima rodrigues on t20 world cup
जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक! ट्वेन्टी२० विश्वचषकाबाबत जेमिमाचे मत
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Cameron Green Doubtful For Border-Gavaskar Trophy After Sustaining Back Injury In England ODIs
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘या’ स्टार अष्टपैलू खेळाडूला झाली दुखापत
Rohit Sharma Became First Captain to Complete 1000 Runs in 2024 IND vs BAN 1st Test
IND vs BAN: रोहित शर्माने चेन्नई कसोटीत केला मोठा पराक्रम; २०२४ मध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार
Travis Head Broke Rohit Sharma Record in ENG vs AUS ODI
ENG vs AUS: ट्रेव्हिस हेडने विक्रमी खेळीसह मोडला रोहित शर्माचा वनडेमधील मोठा विक्रम, ‘बॅझबॉल’चाही उडवला धुव्वा
Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa
कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?
Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल

हेही वाचा – IND vs USA: “तू सूर्यकुमारला का आऊट नाही केलंस?”, नवज्योत सिंग सिद्धूने विचारलेल्या प्रश्नावर नेत्रावळकरने दिले उत्तर; म्हणाला- ‘त्याचा झेल…’

तनजीदने यानंतर लगेच हेल्मेट काढले आणि वैद्यकीय पथकही मैदानावर पोहोचले. प्रोटोकॉलनुसार तनजीदची तपासणी करण्यात आली आणि त्याच्या डोळ्यांचीही तपासणी करण्यात आली. सुदैवाने, त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हती. या सामन्यात तनजीदने २६ चेंडूत ३५ धावांची खेळी खेळली, त्यादरम्यान त्याने ५ चौकार आणि १ षटकारही लगावला.

तनजीदनंतर शाकिब अल हसननेही बांगलादेशसाठी अर्धशतक झळकावले. ६४ धावा करून तो नाबाद राहिला. त्याच्या या दमदार खेळीमुळे बांगलादेश संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून १५९ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. १६० धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करताना प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १३४ धावा करू शकला. संघाकडून सायब्रँड एंजेलब्रेक्टने ३३ धावा केल्या, तर कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने २५ धावा केल्या. बांगलादेशकडून राशिद हुसेनने सर्वाधिक ३ विकेट घेतले.