टी-२० विश्वचषक २०२२ च्या गट २ चा सामना बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळला गेला. या रोमांचक सामन्यात बांगलादेशने ३ धावांनी विजय मिळवला. १९व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूपर्यंत झिम्बाब्वेचा संघ सामन्यात पुढे दिसत होता, तरी चौथ्या चेंडूवर शकीब अल हसनने शानदार थ्रो मारल्याने सामन्याचे चित्र पालटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने नजमुल हुसेन शांतोच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ बाद १५० धावा केल्या होत्या. त्यामुळे झिम्बाब्वे संघाला १५१ धावांचे लक्ष्य मिळाले होते. परंतु हा संघ प्रत्युत्तरात ८ बाद १४७ धावाच करु शकला.

दरम्यान, कर्णधार शकीब अल हसनने बांगलादेशसाठी १९ वे षटक टाकले. त्याने पहिल्या ३ चेंडूत ७ धावा दिल्या. झिम्बाब्वेला पुढच्या नऊ चेंडूत १९ धावा करायच्या होत्या. झिम्बाब्वेसाठी हे काम सोपं होतं, कारण सीन विल्यम्स आणि रायन बर्ले यांनी चांगली भागीदारी रचली होती. विल्यम्सने ६४ आणि बर्लेने २७ धावा केल्या होत्या, पण १९व्या षटकातील चौथ्या चेंडूने सामन्याचे चित्र बदलले.

शाकिबचा हा चेंडू सीन विल्यम्सने खेळला, पण चेंडू शाकिबच्या जवळच राहिला. याचदरम्यान शॉन विल्यम्स धावला, पण शकीबने पटकन चेंडू पकडत नॉन स्ट्राईकच्या स्टंपला लक्ष्य केले आणि त्याच्या जोरदार थ्रोमुळे स्टंप विखुरले. शॉन विल्यम्स त्यावेळी फ्रेममध्येही नव्हता. या थ्रोने बांगलादेशने पुनरागमन केले आणि अखेरीस सामना ३ धावांनी जिंकला. कारण दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत राहिल्या आणि बर्ले नॉन-स्ट्राइकिंग एंडवर राहिला.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : १० वर्षांपूर्वीचा दक्षिण आफ्रिकेचा तो वचपा भारत काढणार; पाकिस्तानची धडधड वाढणार