अ‍ॅडलेड : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ‘अव्वल १२’ फेरीच्या सामन्यात भारताच्या विराट कोहलीने आभासी क्षेत्ररक्षण केल्याचा आरोप बांगलादेशचा यष्टीरक्षक-फलंदाज नुरुल हसनने केला आहे. पंच मरे इरॅस्मस आणि ख्रिस ब्राऊन यांनी कोहलीच्या कृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे दंडात्मक स्वरूपात मिळणाऱ्या पाच धावांना बांगलादेशला मुकावे लागले असाही नुरुलचा दावा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ट्वेन्टी-२० विश्वचषकात बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशला डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार पाच धावांनी पराभूत केले होते. धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने अप्रतिम सुरुवात केली होती. मात्र, पावसानंतर बांगलादेशच्या फलंदाजांची लय बिघडली, तसेच भारताने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत विजय साकारला. भारताने आमच्यापेक्षा दर्जेदार खेळ केला आणि ते जिंकले, असे सामन्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन म्हणाला होता. मात्र, नुरुलने कोहलीवर आभासी क्षेत्ररक्षणाचा आरोप केला.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh s nurul hasan accuses virat kohli of fake fielding zws