ऑस्ट्रेलियातील टी२० विश्वचषक २०२२ आता अंतिम टप्प्यात आला असून भारतीय चाहत्यांसह जगभरातील प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे की यावेळेस टी२० विश्वचषकाचा बादशाह कोण होणार आहे. १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आयसीसी निवडणुकांव्यतिरिक्त आयसीसीच्या वार्षिक बैठकीसाठी मेलबर्नमध्ये हजर असतील. बैठकीनंतर, सर्व बोर्ड अधिकारी अंतिम सामना पाहतील. अंतिम सामन्यादरम्यान बीसीसीआयचे अधिकारी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या सहकाऱ्यांना भेटतील. पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा अंतिम फेरीचा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहतील अशी माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टी२० विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना ९ नोव्हेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला जाणार आहे. तसेच, दुसरा उपांत्य सामना १० नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध इंग्लंड संघात खेळला जाईल. या सामन्यांमध्ये जो संघ विजयी होईल, त्यांच्यात अंतिम सामना खेळला जाईल.

हेही वाचा :   T20 World Cup: सूर्यकुमारचा फटका आणि विराटबाबत बेन स्टोक्सचे वक्तव्य, पाहा इंग्लिश अष्टपैलू खेळाडू काय म्हणाला

रमीझ राजा यांच्याशी रॉजर बिन्नी करणार चर्चा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आणि पीसीबीचे अधिकारीही आयसीसीच्या बैठकीनंतर एकमेकांची भेट-गाठी घेतील. आशिया चषकासाठी भारत पाकिस्तानात न जाण्यावर मंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊ शकते. नुकतेच आशिया चषकावरून बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये वाद पेटलेला होता. असे म्हटले जात होते की, टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली हादेखील सहभागी होऊ शकतो. याव्यतिरिक्त तो आयसीसी क्रिकेट समितीच्या प्रतिनिधी रूपातही मेलबर्नमध्ये असू शकतो.

हेही वाचा :   ICC हॉल ऑफ फेममध्ये या तीन दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यात आला, जाणून घ्या

“पाकिस्तान आणि भारत या दोन्ही मंडळांमध्ये चर्चेची देवाणघेवाण होणारच. पण बघा, आम्ही अनेक वेळा म्हटल्याप्रमाणे, पाकिस्तानमध्ये टीम इंडिया जाणार की नाही हे आमच्या हातात नाही. ते भारत सरकारवर अवलंबून आहे. शिवाय, पाकिस्तानातील राजकीय परिस्थिती आधीच तणावपूर्ण आहे. नुकतेच इम्रान खान यांच्यावर झालेला हल्ला तुम्ही पाहिला. माजी पंतप्रधान आणि लाडक्या क्रिकेटपटूवर हल्ला होऊ शकतो तर पाहुण्या संघाला सुद्धा धोका असणार नाही असं कोण म्हणणार नाही? याक्षणी तरी पाकिस्तानातील परिस्थिती सुरक्षित नाही. पण हो, २०२३ विश्वचषकसाठी संवाद होतील,” अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला दिली आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci president roger binny will attend the t20 world cup final avw
Show comments