Jay Shah’s victory celebration goes viral : टी-२० विश्वचषक २०२४ मधील अ गटात पाकिस्तानचा पराभव करून भारताने सलग दुसरा विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले. न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या रोमहर्षक सामन्यात भारताने ६ धावांनी पाकिस्तानचा पराभव केला. एकेकाळी पाकिस्तानी संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी हे होऊ दिले नाही. भारताने या स्पर्धेच्या इतिहासात सातव्यांदा पाकिस्तानला पराभूत केले. या विजयानंतर टीम इंडियाच्या क्रिकेटप्रेमींनी जल्लोष साजरा केला. भारताच्या या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना १९ षटकांत सर्वबाद ११९ धावा केल्या. बाबर आझमचा संघ या सामन्यात एकेकाळी मजबूत स्थितीत होता. पाकिस्तान संघाने १४.१ षटकात ४ गडी गमावून ८० धावा केल्या होत्या. त्यामुळे सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकला होता, पण भारतीय गोलंदाजांनी शानदार कमबॅक करत डाव आपल्या बाजूला झुकवला. ज्यामुळे पाकिस्तानला निर्धारित २० षटकात ७ बाद केवळ ११३ धावाच करता आल्या.
जय शाह यांचा व्हिडीओ व्हायरल –
भारताने सामना जिंकल्यानंतर स्टेडियममध्ये सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. हा सामना पाहण्यासाठी बीसीसीआयचे मोठे अधिकारी पोहोचले होते. चेअरमन रॉजर बिन्नी यांच्यासह व्हाईस चेअरमन राजीव शुक्ला, सेक्रेटरी जय शाह आणि आयपीएल चेअरमन अरुण धुमाळ हे सामना पाहत होते. भारताने सामना जिंकताच जय शाहने जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली. त्याची न पाहिलेली शैली सर्वांसमोर आली. ते प्रेक्षकांना अभिवादन करत आपला आनंद व्यक्त करत होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रिंकू सिंग, आवेश आणि खलील यांनी केला डान्स –
हा सामना पाहण्यासाठी रिंकू सिंग, आवेश खान आणि खलील अहमद हे देखील स्टँडवर होते. तिन्ही खेळाडू राखीव खेळाडूंच्या यादीत आहेत. रिंकू, आवेश आणि खलील भारतीय संघाला सतत प्रोत्साहन देत होते. सामना जिंकताच तिन्ही खेळाडू नाचू लागले. कोलकाता नाईट रायडर्सने त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
टीम इंडियाने सर्वात लहान धावसंख्येचा केला यशस्वी बचाव –
टी-२० विश्वचषकात भारताने सर्वात लहान धावसंख्येचा यशस्वी बचाव केला आहे. या बाबतीत भारताने श्रीलंकेची बरोबरी केली. दोघांनी १२० धावांच्या लक्ष्याचा बचाव केला आहे. श्रीलंकेने २०१४ च्या टी-२० विश्वचषकात चितगाव येथे न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. त्याच वेळी, भारतीय संघाने टी-२० मध्ये यशस्वी बचाव केलेली ही सर्वात लाहन धावसंख्या आहे. यापूर्वी टीम इंडियाने २०१६ मध्ये हरारे येथे झिम्बाब्वेसमोर १३९ धावांच्या लक्ष्याचा बचाव केला होता.