A sharp cricketing mind and a gem of a person presented the fielding medal after the semi final : १० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट संघाने अखेर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. काल रात्री टी-२० विश्वचषक २०२४ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करत अंतिम फेरीतील धडक मारली. त्यामुळे आता सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. अशात बीसीसीआयने भारतीय संघाच्या ड्रेसिंगरुमधील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक कोच टी दिलीप आणि माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे पदक प्रदान करताना भारतीय संघाचे कौतुक केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिनेश कार्तिकने टीम इंडियाचे केले कौतुक –

दिनेश कार्तिकने २२ यार्डवरून सुट्टी घेतली असली तरी तो अजूनही कॉमेंट्रीच्या माध्यमातून खेळाशी जोडला गेला आहे. दरम्यान, कार्तिकचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसत होता आणि यादरम्यान त्याने काही खास केले. विशेष काम करण्यापूर्वी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचलेल्या दिनेश कार्तिकने एक खास भाषण केले, जे २०२२ मध्ये टीम इंडियाच्या पराभवाशी संबंधित होते आणि त्यादरम्यान त्यांनी भारतीय संघाच्या खेळाडूंचे कौतुक केले. कर्णधार रोहित व्यतिरिक्त, त्याने राहुल द्रविडबद्दल देखील बोलले आणि टीम इंडियाचे सर्व खेळाडू कार्तिकच्या आगमनाने खूप उत्साहित दिसत होते. यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि हे दृश्य पाहण्यासारखे होते.

दिनेश कार्तिकने ऋषभ सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे पदक प्रदान केले –

यावेळी माजी खेळाडू दिनेश कार्तिक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे पदक देण्यासाठी आला होता. माजी खेळाडू दिनेश कार्तिकने ऋषभ पंतला शानदार झेल घेण्यासोबतच स्टंपिंगसाठी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे पदक प्रदान केले. याआधी पंतने पाकिस्तान संघाविरुद्धच्या सामन्यातील कामगिरीसाठी पण हे पदके जिंकले होते.

हेही वाचा – IND vs ENG : ऋषभ पंतच्या चपळाईने चाहत्यांना झाली धोनीची आठवण, मोईन अलीच्या स्टंपिगचा VIDEO व्हायरल

ऋषभ पंतच्या चपळाईने जिंकली चाहत्यांची मनं –

या सामन्यात आठव्या षटकातील पहिला चेंडू अक्षर पटेलने टाकला, ज्यावर मोईन अलीने पुढे जाऊन मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चतुर अक्षर पटेल त्याला चकवा दिला. त्यामुळे चेंडू मोईनच्या पॅडला लागला आणि विकेटजवळ गेला. दरम्यान, ऋषभ पंतने चपळाई दाखवत ताबडतोब चेंडू उचलला आणि स्टंपवरील बेल्स उडवल्या. मोईन परत येण्यापूर्वीच पंतने त्याला मोठा धक्का देत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पंतचे हे शानदार क्षेत्ररक्षण पाहून कर्णधार रोहित शर्माही खूश झाला. त्याने पंतच्या पाठीवर थाप दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात पंतचा एक झेल सुटला होता. ज्यावर रोहित शर्मा खूप संतापलेला दिसत होता. मात्र, आता तो त्यांच्यासोबत खूप खूश दिसत होता. मात्र, या सामन्यात ऋषभ पंतची बॅट चालली नाही. अवघ्या ४ धावा करून तो बाद झाला, पण त्याची भरपाई त्याने क्षेत्ररक्षणात केली.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci share video dinesh karthik presented rishabh pant with the best fielder medal in dressing room after win against eng vbm