टी-२० विश्वचषका २०२२च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा ५ विकेट्स राखून पराभव करत दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने १९ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य गाठले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने शानदार अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडला दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवणाऱ्या बेन स्टोक्सचे बालपणाचे जीवन खूपच संघर्षमय होते. त्याच्या संघर्षमय जीवनाबद्दल जाणून घेऊया.

छोट्या धावसंख्येसाठीही पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कडवी झुंज दिली. मात्र शाहीन आफ्रिदीच्या दुखापतीमुळे पाकिस्तानची गोलंदाजी कमकुवत झाली. त्याचा फायदा घेत इंग्लंडने इफ्तिखारच्या षटकात झटपट धावा काढल्या आणि दडपण दूर केले. १३७ धावांच्या स्कोअरवर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शेवटपर्यंत कशी झुंज दिली.

यशस्वी होण्यासाठी आपल्या वर्तमानात जगावे लागते आणि बेन स्टोक्स हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. सध्याच्या काळातील महान अष्टपैलू बेन स्टोक्सची कहाणी, ज्याने इंग्लंडला २०२२ च्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिले आहे. त्याची कथा कटुता आणि संघर्षांनी भरलेली आहे. फार कमी लोकांना माहित आहे की बेन स्टोक्सच्या वडिलांशी लग्न करण्यापूर्वी, त्याच्या आई डेबला तिच्या पहिल्या लग्नापासून दोन मुले होती.

बेन स्टोक्सचा भूतकाळ होता खूपच भयानक –

बेन स्टोक्सचा भूतकाळ भयानक राहिला आहे. बेन स्टोक्सचा सावत्र पिता रिचर्ड डनने त्याचा चार वर्षांचा भाऊ अँड्र्यू आणि आठ वर्षांची बहीण ट्रेसी यांची गोळ्या घालून हत्या केली. ही घटना त्यांच्या जन्मापूर्वी १९८८ मध्ये घडली होती. बेन स्टोक्सची आई डेब हिचा पहिला पती रिचर्ड डनपासून घटस्फोट झाला होता. रिचर्ड डनने रागाच्या भरात हे कृत्य केले, जेव्हा त्याला कळले की त्याची माजी पत्नी डेबचे रग्बी प्रशिक्षक गेरार्ड स्टोक्ससोबत प्रेमसंबंध आहेत. मुलांची हत्या केल्यानंतर रिचर्ड डनने स्वतः आत्महत्या केली. गेरार्ड स्टोक्स हे बेन स्टोक्सचे वडील होते.

हेही वाचा – PAK vs ENG Final: बाबर आझमने केला लाजिरवाणा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

बेन स्टोक्स मूळचा आहे न्यूझीलंडचा –

बेन स्टोक्सचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला. पुढे बेन स्टोक्स १२ वर्षांचा झाला तेव्हा त्याचे पालक त्याला न्यूझीलंडहून इंग्लंडला घेऊन गेले. बेन स्टोक्सच्या आईला क्रिकेटची खूप आवड होती. बेन स्टोक्सचा केवळ टी२० विश्वचषक २०२२ जिंकण्यातच नव्हे तर इंग्लंडला २०१९ एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यातही महत्त्वाचा वाटा होता.

Story img Loader