ऑस्ट्रेलियात सुरु असणाऱ्या टी२० विश्वचषक २०२२ मधील इंग्लंड विरुद्ध भारत सेमीफायनल सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली जखमी झाला आहे. नेटचा सराव करताना हर्षल पटेलचा चेंडू विराट कोहलीच्या मांडीवर आदळला. वृत्तानुसार, विराट कोहलीला खूप दुखापत झाली असून तो नेट प्रॅक्टिस अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला आहे.

विराट कोहलीच्या दुखापतीबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यापूर्वी नेट सराव करत होता. हर्षल पटेलच्या एका वेगवान चेंडूने विराट कोहलीच्या मांडीला दुखापत झाली आहे. दुखापतीनंतर विराट कोहली मैदानाबाहेर गेला. संघ व्यवस्थापनाकडून विराट कोहलीबाबतचे अपडेट लवकरच जारी केले जाऊ शकते.

balmaifal article loksatta
बालमैफल: स्वच्छ सुंदर सोसायटी…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Prime Minister Narendra Modis announcement to give guaranteed price of 6 thousand for soybeans
सोयाबीनला सहा हजारांचा हमीभाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
Sanju Samson reach 39th position in ICC T20I rankings
Sanju Samson : संजू सॅमसनची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप! सलग दोन सामन्यात शतक झळकावत पटकावले ‘हे’ स्थान
Prithvi Shaw Dance Video Viral of his 25th Birthday Party Trolled for Disciplinary Issues in Ranji Trophy
Prithvi Shaw: पृथ्वी शॉचा वाढदिवसाच्या पार्टीत ‘तांबडी चामडी’ गाण्यावर भन्नाट डान्स, सोशल मीडियावर होतोय ट्रोल, VIDEO व्हायरल
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’

विराट कोहलीची दुखापत जर गंभीर असेल तर टीम इंडियासाठी मोठा झटका ठरू शकते. विराट कोहली या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. टीम इंडियाने गटात अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरीत धडक मारली हा विराट कोहलीच्या कामगिरीचा चमत्कार आहे. विराट कोहली हा त्या उंचीचा खेळाडू आहे ज्याची जागा दुसरा कोणी घेऊ शकत नाही.

हेही वाचा :  T20 WC 2022 NZ vs PAK: न्यूझीलंड-पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पाऊस खलनायक ठरणार? जाणून घ्या हवामान 

याआधी मंगळवारी कर्णधार रोहित शर्मालाही नेट सराव करताना दुखापत झाली होती. मात्र, काही वेळाने रोहित शर्मा मैदानात परतला. रोहित शर्माने बुधवारी त्याचे फिटनेस अपडेट जारी केले. सेमीफायनल सामना खेळण्यासाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे रोहित शर्माने सांगितले आहे. आयसीसी टी२० विश्वचषक २०२२च्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना १० नोव्हेंबरला ऍडलेडच्या ओव्हलमध्ये खेळला जाणार आहे. या महत्वपूर्ण सामन्याची पूर्वतयारी म्हणून भारतीय संघ मैदानावर सराव करण्यास पोहोचला, तेव्हाच भारताचा स्टार फलंदाज दुखापतग्रस्त झाला. आता त्याची ही दुखापत किती गंभीर हे लवकरच कळेल.