टी २० क्रिकेट स्पर्धेत जगज्जेता ठरलेल्या भारतीय संघाचं मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत झालं. विश्वकप घेऊन या संघाने गुरुवारी मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअमवर असा रोड शो केला. आपल्या लाडक्या भारतीय संघाचं स्वागत करण्याकरता हजारोंच्या संख्येने मरिन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडिअमवर गर्दी जमली होती. वानखेडेवरील स्टेडिअमवर तर हार्दिक पांड्याच्या नावाचाही जयघोष झाला. ज्या वानखेडे स्डेडियमवर आयपीयलच्या दरम्यान हार्दिक पंड्याला हिणवण्यात आलं होतं, त्याच स्टेडिअमवर त्याच्या नावाचा जयघोषण करण्यात आला.

भारतीय टी-२० विश्वचषक विजेता संघ बुधवारी सकाळीच भारतात परतला. २९ जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय संघ वादळामुळे काही दिवस बार्बाडोसमध्ये अडकला होता. बीसीसीआय आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांमुळे भारतीय संघ चार्टर्ड फ्लॅटद्वारे मायदेशी परतू शकला. मायदशी परतल्यानंतर टीम इंडियाचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया मुंबईतही आली. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअम असा भव्य रोड शो त्यांच्या स्वागतासाठी करण्यात आला.

Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
Natasa Shares Cryptic Video As Hardik Pandya Returns
हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने टीम इंडिया भारतात येताच केलेली पोस्ट पाहून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; लिहिलं, “तेव्हा माझं रक्षण..”
Rishabh Pant Medical Time Out Delayed The Game with Perfect Move
T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
Jasprit Bumrah Viral Funny Video Post IND vs ENG
“बुमराह तू ये, माझा हात..”, IND vs ENG मॅच जिंकताच अंपायरच्या भेटीला गेला जसप्रीत पण.. Video पाहून चाहते लोटपोट
What Virat Kohli Said About Jasprit Bumrah?
विराट कोहलीने केलं बुमराहचं कौतुक,”जसप्रीत जगातलं आठवं आश्चर्य, त्याला आता राष्ट्रीय…”
virat kohli daughter vamika biggest concern after India won t20 worldcup
“खेळाडूंना रडताना पाहून…”, भारताच्या विजयानंतर अनुष्का शर्माची पहिली पोस्ट! विराटच्या लेकीला वाटली याबद्दल काळजी

भारतीय क्रिकेट संघाने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक आणि १३ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. विजयाचा हा आनंद साजरा करण्यासाठी आज मरीन ड्राईव्ह ते वानखेडे मैदानापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. २००७ रोजी भारताने पहिलाच टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतरदेखील मरीन ड्राईव्ह ते वानखेडे अशी मिरवणूक काढली गेली होती. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाचे स्वागत मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात केले होते. रोहित शर्मा त्या संघाचाही भाग होता आणि आजच्या जगज्जेत्या संघाचा तो कर्णधार आहे.

हेही वाचा >> क्रिकेट संघाच्या मिरवणुकीसाठी गुजरातची बस, विरोधकांची सरकारवर टीका; म्हणाले, “आमची BEST…”

आयपीलएमध्ये टीका, पण टी २० मध्ये उत्तम कामगिरी

दरम्यान, जगज्जेत्या संघाला भेटण्याकरता वानखेडे स्टेडिअमवरही गर्दी जमली होती. वानखेडेवरील चाहत्यांनी हार्दिक पंड्याच्या नावाचा जयघोष केला. दोन महिन्यांपूर्वी याच वानखेडेवर आयपीएल मॅचदरम्यान हार्दिक पंड्याच्या खेळावरून त्याला डिवचण्यात आलं होतं. त्याच्यावर सर्व स्तरांतून टीका केली जात होती. परंतु, आता टी २० वर्ल्डकपमध्ये त्याने सर्वोत्तम कामगिरी केल्याने त्याचं कौतुकही केलं गेलं.

दरम्यान, मुंबईत येण्याआधी त्याने एक ट्वीट केलं होतं. त्यात त्याने वानखेडे, सी यू सून असं म्हटलं होतं.

भारतीय क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल बीसीसीआयच्या वतीने वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आला. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी हजेरी लावावी यासासाठी वानखेडे स्टेडियममध्ये मोफत प्रवेश देण्यात आला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांनी ही घोषणा केली होती. स्टेडियममध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर प्रवेश मिळाला. स्टेडिअमबाहेर इतकी गर्दी जमली होती पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.