टी-२० विश्वचषकाच्या २४व्या सामन्यात झिम्बाब्वेने मोठा उलटफेर केला. त्यांनी २००९ च्या चॅम्पियन पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानसाठी स्पर्धेतून बाहेर होण्याचा धोका वाढला आहे. आता त्यांना उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांचे उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील आणि इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. सामन्यातील शेवटचे षटक अतिशय रोमांचक होते. यावेळी प्रेक्षकांनीच नव्हे तर कॉमेंटेटरने देखील श्वास रोखून धरला होता.
आयसीसीने शेवटच्या चेंडूचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटर आणि प्रसिद्ध कॉमेंटेटर पोम्मी म्बांगवा कॉमेंट्री करताना दिसत आहे. पाकिस्तानला विजयासाठी एका चेंडूत तीन धावा करायच्या होत्या. त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये एक रंजक दृश्य पाहायला मिळाले. म्बांगवासोबत पाकिस्तानचा बाजिद खान कॉमेंट्री करत होता. शेवटच्या चेंडूवर तो पूर्णपणे शांत दिसत होता. त्याचवेळी म्बांगवा पूर्ण जोशात दिसला.
शेवटच्या चेंडूवर भाष्य करताना म्बांगवा म्हणाला, ”सामन्यात झिम्बाब्वे जवळपास संपुष्टात आला होता. धावफलकावर अवघ्या १३० धावा होत्या, पण पर्थच्या उसळत्या खेळपट्टीवर संघाच्या उंच गोलंदाजांनी आपले कौशल्य दाखवले. सिकंदर रझाने मधल्या षटकांमध्ये आपल्या फिरकी चेंडूंच्या जोरावर तीन बळी घेत झिम्बाब्वेला विजय मिळवून दिला. हा एक अद्भुत विजय आहे.”
काय लागला घडलं सामन्यात?
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने पाकिस्तानसमोर १३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ आठ गडी गमावून केवळ १२९ धावाच करू शकला आणि एका धावेने सामना गमावला.
झिम्बाब्वेकडून सीन विल्यम्सने सर्वाधिक ३१ धावा केल्या. त्यांच्याशिवाय क्रेग इर्विन आणि ब्रॅड इव्हान्स यांनी १९-१९ धावा केल्या. पाकिस्तानकडून शादाब खानने तीन आणि मोहम्मद वसीम ज्युनियरने चार विकेट घेतल्या. त्याचवेळी पाकिस्तानकडून शान मसूदने फलंदाजी करताना ४४ धावा केल्या. मोहम्मद नवाजने २२ आणि शादाब खानने १७ धावा केल्या. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने तीन आणि ब्रॅड इव्हान्सने दोन विकेट घेतल्या.