David Warner Walks Into Oman Dressing Room Video : टी-२० विश्वचषक २०२४ मधील १० वा सामना ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांच्यात खेळला गेला. बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ओमानवर ३९ धावांनी विजय मिळवत विजयी सलामी दिली. दरम्याने या सामन्यात डेव्हिड वॉर्नरसोबत असं काहीतरी आश्चर्यकारक घडलं. ज्यामुळे स्फोटक फलंदाज बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाऐवजी ओमानच्या ड्रेसिंग रूममध्ये जाताना दिसला. मात्र, अर्ध्या पायऱ्या चढल्यानंतर तो परत माघारी आला आणि आपल्या ड्रेसिंग रूममध्ये गेला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहते यावर प्रतिक्रिया देत आहेत.

या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ गडी गमावून १६४ धावा केल्या. प्रत्युतरात ओमान संघाला ९ बाद १२० धावांच करता आल्या. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने ३९ धावांनी जिंकला. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी ५१ चेंडूत ५६ धावांची खेळी केली, ज्यात ६ चौकार आणि १ षटकार होता. त्याला ओमानचा गोलंदाज कलिलमुल्लाहने झेलबाद केले.

यानंतर डेव्हिड वॉर्नर आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जाताना चुकून ओमानच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊ लागला. पण मध्येच त्याला कोणीतरी आठवण करुन दिली की तो ओमानच्या ड्रेसिंग रूममध्ये जात आहे. तो पर्यंत डेव्हिड वॉर्नर ओमानच ड्रेसिंगच्या निम्या पायऱ्या चढला होता. यानंतर तो माघारी फिरला आणि ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूमकडे गेला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून चाहत्यांना तो प्रचंड आवडत असून त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडत आहेत.

हेही वाचा – IND vs IRE : भारताने आयर्लंडवर मात करत पाकिस्तानला टाकले मागे, टी-२० विश्वचषकात ‘हा’ विक्रम करणारा ठरला दुसरा संघ

एकेकाळी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढासळली होती. संघाच्या ३ विकेट्स ५० धावांत पडल्या होत्या. यानंतर वॉर्नर आणि मार्कस स्टॉइनिस यांनी डाव सांभाळत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. स्टॉइनिसच्या बॅटमधून वादळी खेळी पाहायला मिळाली. या स्फोटक फलंदाजाने १८६ च्या स्ट्राईक रेटने ३६ चेंडूत नाबाद ६७ धावां खेळी साकारली. त्याच्या या खेळीत ६ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता. ट्रॅव्हिड हेड (१२ धावा) आणि ग्लेन मॅक्सवेल (०) फ्लॉप ठरले.

हेही वाचा – IND vs IRE : “मला वाटते की खेळपट्टी अद्याप…”, रोहित शर्माने न्यूयॉर्कच्या ‘ड्रॉप इन पिच’ व्यक्त केली नाराजी

टी-२० सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासाठी चौथ्या किंवा त्यापेक्षा खालच्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी :

१६१ धावा – डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, २०१६
१०२ धावा – डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टॉइनिस विरुद्ध ओमान, बार्बाडोस, २०२४
९९* धावा – ग्लेन मॅक्सवेल आणि पीटर हँड्सकॉम्ब विरुद्ध भारत, बंगळुरू, २०१९
९३ धावा – शेन वॉटसन आणि ट्रॅव्हिस हेड विरुद्ध भारत, सिडनी, २०१६
८४* धावा – डेव्हिड वॉर्नर आणि ॲडम व्होजेस विरुद्ध श्रीलंका, सिडनी, २०१३