David Wiese Announces Retirement: पावसाचा लपंडाव सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात नामिबियाच्या संघाला ४१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. टी-२० विश्वचषक २०२४ मधील नामिबियाचा प्रवास संपला आहे. संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असून केवळ एकच सामना जिंकता आला. याच कारणामुळे नामिबियाचा संघ सुपर८ मध्ये पोहोचू शकला नाही. आता नामिबियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू डेव्हिड व्हिसा याने निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंडविरुद्धचा सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नामिबियाचा इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर व्हिसाने हा निर्णय घेतला. २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा व्हिसा २०२१ मध्ये नामिबियाला गेला आणि तिथे खेळण्यास सुरूवात केली. नामिबियासाठी त्याने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी दुबईतील आयसीसी अकादमी येथील युएईविरूद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने नामिबियासाठी ३४ टी-२० सामन्यांमध्ये प्रभावी इकॉनॉमी रेटने ३५ विकेट घेतले. त्याने नामिबियासाठी टी-२० मध्ये १२८.८१ च्या स्ट्राइक रेटने ५२८ धावा केल्या आणि तीन अर्धशतके केली. नऊ एकदिवसीय सामन्यांमध्ये एका अर्धशतकासह २२८ धावा केल्या आणि सहा विकेट्सही घेतल्या.

हेही वाचा – IND vs CAN सामना रद्द झाल्याने सुनील गावसकर ICC वर भडकले, म्हणाले; “मॅच खेळवूच नका…”

३९ वर्षीय व्हिसाने त्याच्या अखेरच्या टी-२० सामन्यातही झंझावाती खेळी केली. त्याने फक्त १२ चेंडूंमध्ये २२५ च्या प्रभावी स्ट्राईक रेटने २७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, ज्यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात लाँग-ऑनवर आऊट झाला. या स्टार अष्टपैलू खेळाडूने बॉलसह चमकदार कामगिरी केली, त्याने इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्टची मोठी विकेट मिळवली आणि दोन षटकांच्या स्पेलमध्ये ३ च्या इकॉनॉमी रेटने फक्त सहा धावा दिल्या.

हेही वाचा – IND vs CAN: पाऊस नसतानाही का रद्द झाला भारत वि कॅनडा सामना? जाणून घ्या कारण

“पुढच्या वर्षीचा टी-२० विश्वचषक अजून दोन वर्षांनी आहे, मी आता ३९ वर्षांचा आहे. साहजिकच, मला अजून काही वर्षे खेळायला आवडेल, मला असे वाटते की मला अजूनही खूप योगदान द्यायचे आहे आणि खूप खेळायचंही आहे. परंतु मला असं वाटते की वैयक्तिकरित्या माझ्यासाठी या विशेष क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्यासाठी इतर कोणती चांगली संधीच असूच शकत नाही. नामिबिया संघासोबत खूप चांगला वेळ घालवता आला आणि इंग्लंडसारख्या जागतिक दर्जाच्या संघाविरुद्ध नामिबियासाठी माझा शेवटचा सामना खेळणं, हीच योग्य वेळ असल्यासारखे वाटत आहे. असं सामन्यानंतर डेव्हिड व्हिसा म्हणाला.

हेही वाचा – ‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”

आयपीएलमध्येही खेळलाय व्हिसा

३९ वर्षीय डेव्हिड व्हिसा हा आयपीएलमध्ये आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा भाग होता. त्याने आयपीएलमध्ये एकूण १५ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने एकूण १२७ धावा केल्या आणि १६ विकेट घेतल्या. व्हिसाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो जगभरातील क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसेल.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: David wiese retired from t20i after playing namibia vs england last world cup 2024 match bdg