Dhoni bhai such a great player felt good that he appreciated us : टी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये टीम इंडियाच्या विजयाने एमएस धोनीला त्या स्टेजवर यायला भाग पाडले जिथून तो दूर राहणे पसंत करतो. बार्बाडोसमध्ये झालेल्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कप जिंकताच धोनीने इन्स्टाग्रामवर त्यांचे भरभरून कौतुक केले. आता धोनीने स्तुती केली आणि रोहित त्यावर काहीच बोलला नाही असे कसे होईल? बार्बाडोसमध्ये टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी उंचावणारा कर्णधार रोहित शर्माला धोनीने टीम इंडियासाठी काहीतरी बोलल्याचं समजताच, त्याने त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास उशीर केला नाही.
बार्बाडोसमध्ये एएनआयशी बोलताना रोहित शर्माने धोनीने केलेल्या स्तुतीवर प्रतिक्रिया दिली. खरंतर, रोहितला पहिल्यांदा सांगण्यात आलं होतं की धोनीनं इंस्टाग्रामवर टीम इंडियाच्या विजेतेपदाचं कौतुक केलं होतं. यानंतर १७ वर्षांनंतर भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधाराने धोनीच्या स्तुतीला प्रतिक्रिया दिली. टीम इंडियाला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा रोहित धोनीनंतरचा दुसरा कर्णधार आहे.
रोहित शर्मा धोनीबद्दल काय म्हणाला?
रोहित शर्माने सर्वप्रथम धोनीचे कौतुक केले. तो म्हणाला की तो एक महान खेळाडू आहे, त्याने देशासाठी खूप काही केले आहे. आता त्याने जर कौतुक केले असेल, तर ती माझ्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी खूप मोठी गोष्ट आहे.
टीम इंडियाच्या विजयावर धोनी काय म्हणाला?
आता हे देखील जाणून घेऊया की धोनीने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये टीम इंडिया टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल काय लिहिले होते. एमएस धोनीने इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये लिहिले की, “टीम इंडिया विश्वविजेते! फायनल पाहताना माझे हृदयाचे ठोके वाढले होते. दडपणाच्या स्थितीत शांत राहून, स्वत:च्या कौशल्यांवर विश्वास ठेऊन तुम्ही विजयश्री खेचून आणलीत. याकरता तुमचं मनापासून अभिनंदन. वर्ल्डकप पुन्हा भारतात आणल्याबद्दल समस्त भारतीयांच्या वतीने धन्यवाद आणि खूप शुभेच्छा!”
हेही वाचा – ‘बुमराहची आई १६-१८ तास काम करायची…’, एका पोस्टने उलगडले जसप्रीतच्या आयुष्यातील सर्वात मोठे भावनिक क्षण
टीम इंडियाच्या विजयानंतर रोहितने मोठी गोष्ट सांगितली –
एएनआयशी बोलताना, धोनीने केलेल्या स्तुतीवर प्रतिक्रिया देण्याव्यतिरिक्त, रोहित शर्माने टीम इंडियाच्या विजयाबद्दल आणि त्याच्या प्रवासाबद्दल देखील सांगितले. तो म्हणाला की त्याने २००७ मध्ये खेळायला सुरुवात केली होती. त्याच वर्षी टीम इंडियाने आपला पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा या ट्रॉफीवर नाव कोरल्याने तो खूप खूश आहे.