ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी२० विश्वचषकाचा आज समारोप झाला. टी२० विश्वचषकाचा अंतिम फेरीतील सामना रविवारी (१३ नोव्हेंबर) रोजी ऐतिहासिक मेलबर्न मधील एमसीजी म्हणजेच मेलबर्न क्रिकेट मैदानवर संपन्न झाला. टी२० विश्वचषकाचा अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभव करत टी२० विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरले. यावर रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणारा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोएब अख्तरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “ वेल डन पाकिस्तान टीम तुम्ही निराश होऊ नका. त्रास खूप होत आहे मात्र तुम्ही लढून खेळलात हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे. विजय-पराभव होत असतात त्याने तुम्ही खचून जावू नका. शाहीन शाह आफ्रिदी दुखापतग्रस्त झाला तिथेच सामना इंग्लंडच्या बाजूने झुकला. बेन स्टोक्सने शानदार फलंदाजी करत संघाला विश्वचषक जिंकून दिला आणि तो हिरो ठरला. कधी काळी त्याने २०१६च्या टी२० विश्वचषकात वेस्ट इंडीज विरुद्ध एकाच षटकात पाच षटकार खाल्ले होते मात्र आज त्याने त्याची भरपाई करत संघाला पुन्हा विश्वचषक जिंकून देण्यात मदत केली. तुम्ही सुद्धा निराश होऊ नका, आपल्याला पण या पराभवाची भरपाई करायला मिळेल आणि पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात इंशः अल्ला भारतात आपण नक्की विजयी होऊ. एक देश म्हणून आम्ही सदैव तुमच्या पाठिशी राहू आम्हाला तुमचा अभिमान आहे.”

मेलबर्न येथील एमसीजी मैदानावर संपन्न झालेल्या या सामन्यात इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपला गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवत पाकिस्तानला निर्धारित २० षटकात ८ बाद १३७ धावांवर रोखले. फिरकीपटू आदिल राशिद व सॅम करनने उपांत्य सामन्यानंतर अंतिम सामन्यातही शानदार गोलंदाजी केली.

हेही वाचा :  T20 World Cup 2022: असा विक्रम करणारा हा खेळाडू पहिल्यांदाच ठरला मालिकावीर पुरस्काराचा मानकरी 

दुसऱ्यांदा टी२०चा चषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या दोन्ही संघांनी विजयी संघात कोणताही बदल केला नाही. प्रथम फलंदाजीसाठी पाकिस्तानला इंग्लंडने आमंत्रित केले. पाकिस्तानसाठी बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी २९ धावांची सलामी दिली. रिझवान या सामन्यात केवळ १५ धावा करून बाद झाला. युवा मोहम्मद हॅरिस या सामन्यात अपयशी ठरला. कर्णधार बाबरने २८ चेंडूवर ३२ धावांची संथ खेळी केली. शान मसूदने ३८ तर शादाब खानने २० धावांचे योगदान दिले.   

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eng vs pak t20 wc dil dukha hai fast bowler shoaib akhtar expresses his feelings on pakistans loss avw