ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी२० विश्वचषकाचा आज समारोप झाला. टी२० विश्वचषकाचा अंतिम फेरीतील सामना रविवारी (१३ नोव्हेंबर) रोजी ऐतिहासिक मेलबर्न मधील एमसीजी म्हणजेच मेलबर्न क्रिकेट मैदानवर संपन्न झाला. टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात आज मेलबर्न येथे खेळवला गेला त्यात इंग्लंडने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभव करत टी२० विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरले. बेन स्टोक्सने झुंजार अर्धशतकी खेळी करत संघाला विश्वचषक जिंकून दिला. मात्र मोक्याच्या क्षणी तीन गडी बाद करणाऱ्या सॅम करनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

पाकिस्तानने ठेवलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडला पहिल्याच षटकात जबर धक्का बसला. मागील सामन्यात नाबाद अर्धशतक पूर्ण करणारा ऍलेक्स हेल्स शाहिन आफ्रिदीचा शिकार ठरला. चाचपडत खेळणारा फिल सॉल्ट केवळ दहा धावा करत बाद झाला. कर्णधार जोस बटलरने झटपट २६ धावा ठोकल्या. बटलर बाद झाला तेव्हा इंग्लंड संघ संकटात सापडला होता. मात्र, अनुभवी बेन स्टोक्सने हॅरी ब्रुकसह ३९ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. अडखळत खेळत असलेल्या स्टोक्सने खराब चेंडू मिळतात नवाझ याच्यावर हल्ला चढवत इंग्लंडच्या विजयाचे दरवाजे खुले केले. मोईन अलीनेही वसीमला तीन चौकार ठोकत पाकिस्तानला सामन्यातून बाहेर नेले. मोईनने १३ चेंडूवर १९ धावांचे योगदान दिले. स्टोक्सनेच आपले अर्धशतक पूर्ण करून संघासाठी विजयी धाव काढली.

IND vs AUS Team India Coach Amol Muzumdar
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय कोचच्या पाकिस्तानला शुभेच्छा, कट्टर प्रतिस्पर्ध्याच्या विजयासाठी चाहत्यांकडून प्रार्थना
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Pakistan Drop Babar Azam Shahen Shah Afridi and Naseem Shah For Last Two Tests Against England PAK vs ENG Test
PAK vs ENG: बाबर आझमची इंग्लंडविरूद्धच्या कसोटी संघातून हकालपट्टी, बाबरसह अनेक स्टार खेळाडूंना दिला डच्चू, कसा आहे नवा संघ?
PAK vs ENG Pakistan vs England 2nd test match use the same pitch in Multan
PAK vs ENG : पाकिस्तानने दुसरी कसोटी जिंकण्यासाठी आखला नवा डावपेच, खेळपट्टीबाबत घेतला मोठा निर्णय
Babar Azam Set To Be Dropped From Pakistan Playing 11 For 2nd Test Against England PAK vs ENG
Babar Azam: बाबर आझम पाकिस्तानच्या कसोटी संघातून होणार बाहेर, इंग्लंडविरूद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटचा सर्वात मोठा निर्णय
AUS W vs PAK W Australia beat Pakistan by 9 Wickets
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताची वाढवली डोकेदुखी, टीम इंडिया कशी पोहोचणार उपांत्य फेरीत?
PAK vs ENG Shan Masood reaction after England beat Pakistan by an innings by 47 runs
PAK vs ENG : ‘आता सामना कसा फिनिश करायचा…’, इंग्लंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार संतापला
England Beat Pakistan by 47 Runs and An Innings in Multan Test ENG vs PAK Harry Broke Triple Century Joe Root
PAK vs ENG: पाकिस्तानचा इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही

तत्पूर्वी, मेलबर्न येथील एमसीजी मैदानावर संपन्न झालेल्या या सामन्यात इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपला गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवत पाकिस्तानला निर्धारित २० षटकात ८ बाद १३७ धावांवर रोखले. फिरकीपटू आदिल राशिद व सॅम करनने उपांत्य सामन्यानंतर अंतिम सामन्यातही शानदार गोलंदाजी केली. दुसऱ्यांदा टी२०चा चषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या दोन्ही संघांनी विजयी संघात कोणताही बदल केला नाही. प्रथम फलंदाजीसाठी पाकिस्तानला इंग्लंडने आमंत्रित केले. पाकिस्तानसाठी बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी २९ धावांची सलामी दिली. रिझवान या सामन्यात केवळ १५ धावा करून बाद झाला. युवा मोहम्मद हॅरिस या सामन्यात अपयशी ठरला. कर्णधार बाबरने २८ चेंडूवर ३२ धावांची संथ खेळी केली. शान मसूदने ३८ तर शादाब खानने २० धावांचे योगदान दिले.

इंग्लंडच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत एकही पाकिस्तानी फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. सॅम करनने टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजीला खेळपट्टीवर तग धरू दिले नाही. त्याने ४ षटकात फक्त १२ धावा देत पाकिस्तानचे ३ फलंदाज बाद केले. याचबरोबर आदिल राशिदने बाबर आझम हा इंग्लंडसमोरील मोठा अडसर दूर केला. त्याने २२ धावा देत दोन गडी बाद केले. ख्रिस जॉर्डननेही २ बळी घेत इंग्लंड संघाला मदत केली. यामुळे पाकिस्तानला २० षटकात ८ बाद १३७ धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक ३८ धावा केल्या. तर कर्णधार बाबर आझमने ३२ धावा केल्या.