T20 World Cup 2024, England Super-8 qualification scenario : गतविजेत्या इंग्लंडने पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाच्या (डीएलएस पद्धती) आधारे नामिबियाचा ४१ धावांनी पराभव केला. स्पर्धेतील ३४ वा सामना जिंकूनही इंग्लंडचा संघ स्पर्धेत जिवंत आहे. या विजयासह त्याचे ब गटातील ४ सामन्यांत ५ गुण झाले आहेत. तो स्कॉटलंडच्या पुढे गेला (३ सामन्यांत ५ गुण). इंग्लंडचा नेट रन रेट +३.५२१आहे. या बाबतीत, स्कॉटलंड (+२.१६४ नेट रन रेट) त्याच्या मागे आहे.
पावसामुळे १०-१० षटकांचा झाला सामना –
नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पावसामुळे सामना ११-११ षटकांचा करण्यात आला. त्यानंतर इंग्लंडच्या डावात पुन्हा पाऊस पडला आणि एक षटक कमी झाले. अशा प्रकारे सामना १०-१० षटकांचा खेळवण्यात. ज्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत ५ गडी गमावून १२२ धावा केल्या होत्या. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार नामिबियाला १० षटकांत १२३ धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात नामिबियाच्या संघाला १० षटकांत ३ बाद ८४ धावाच करता आल्या.
इंग्लंड सुपर-८ मध्ये कसा पोहोचणार?
ब गटात ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे. त्याचे ३ सामन्यांत ६ गुण आहेत. तो आधीच सुपर-८ मध्ये पोहोचला आहे. नामिबियाला हरवून इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्याचा स्कॉटलंडविरुद्धचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर ओमान आणि नामिबियाचा पराभव केला. अशाप्रकारे त्याला ४ सामन्यांत ५ गुण मिळाले. स्कॉटलंडने ओमान आणि नामिबियावर विजय मिळवला होता.
हेही वाचा – कामरान अकमलचा पुन्हा एकदा वाचाळपणा; म्हणाला, ‘विराट कोहलीपेक्षा उमरची आकडेवारी चांगली…”, पाहा VIDEO
त्याचे ३ सामन्यांत ५ गुण आहेत. ओमान आणि नामिबिया सुपर-८ च्या शर्यतीतून बाहेर आहेत. आता इंग्लंडला सुपर-८ फेरी गाठायची असेल तर ऑस्ट्रेलियन संघ स्कॉटलंडला हरवो अशी प्रार्थना करावी लागेल. स्कॉटलंडने हा सामना जिंकला किंवा तो रद्द झाला तर इंग्लंड संघ बाहेर होईल. स्कॉटलंड सुपर-८ मध्ये पोहोचेल. अशा स्थितीत जोस बटलरचा संघ सुपर-८ फेरीत पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियावर अवलंबून आहे.
;चांगल्या सुरुवातीनंतर नामिबियाला पत्करावा लागला पराभव –
१० षटकांत १२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाची सुरुवात चांगली झाली. मायकेल व्हॅन लिंगेन आणि निकोलस डेव्हिन यांनी पहिल्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली, ज्याचा शेवट सहाव्या षटकात निकोलस डेव्हिनच्या विकेटसह झाला. त्याने १६ चेंडूत १८ धावा केल्या. त्यानंतर नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मायकेल व्हॅन लिंगेनच्या रूपाने संघाला दुसरा धक्का बसला. मायकेलने ३३ धावांची खेळी खेळली. यानंतर संघाला तिसरा धक्का दहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर डेव्हिड व्हिसाच्या रूपाने बसला, तेव्हा संघाची धावसंख्या ८२ धावा होती. अशाप्रकारे नामिबियाच्या संघाला १० षटकांत केवळ ३ बाद ८४ धावा करु शकला.