England vs Oman T20 World Cup 2024 Match Highlights: इंग्लंडच्या संघाने शानदार कमबॅक करत सुपर८ फेरीतील शर्यतीत कायम आहेत. अँटिगा येथी सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर इंग्लंड आणि ओमान यांच्यातील सामन्यात इंग्लंडने आश्चर्यकारक कामगिरी केली. या सामन्यात त्यांनी ओमानविरुद्ध मोठा विजय नोंदवला, ज्यामुळे ते अजूनही सुपर८ च्या शर्यतीत आहेत. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना ओमानला अवघ्या ४७ धावांत ऑलआउट केले. त्यानंतर ३.१ षटकात ८ विकेट्स राखून लक्ष्याचा पाठलाग केला.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून ओमानविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर ओमानचे फलंदाज चांगलेच फसले. तो १३.२ षटकांत अवघ्या ४७ धावांवर ऑलआऊट झाला. ओमानकडून शोएब खानने सर्वाधिक ११ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून आदिल रशीदने सर्वाधिक ४ विकेट घेतले. याशिवाय मार्क वूड आणि जोफ्रा आर्चरनेही ३-३ विकेट घेतले.
ओमानचे फलंदाज ज्या खेळपट्टीवर सतत संघर्ष करताना दिसत होते. त्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांनी कहर केला. ४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला फारसा वेळ लागला नाही. इंग्लंडने अवघ्या ३.१ षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला, ज्यामुळे त्यांच्या नेट रन रेटमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. कर्णधार जोस बटलरने ३००च्या स्ट्राईक रेटने ८ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या, त्याने या खेळीत ४ चौकार आणि १ षटकार लगावला. फिल सॉल्टने ३ चेंडूत १२ तर जॉनी बेअरस्टोने २ चेंडूत ८ धावा केल्या. ओमानकडून बिलाल खान आणि कलीमुल्ला यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवला.
हेही वाचा – T20 WC 2024: अफगाणिस्तान पहिल्यांदाच सुपर८ मध्ये; न्यूझीलंड, श्रीलंकेची ‘घरवापसी’ पक्की
England get it done in Antigua ??#T20WorldCup | #ENGvOMA | ? https://t.co/hrhtHZS64T pic.twitter.com/Jz4FbkIIvE
— ICC (@ICC) June 13, 2024
ब गटातून ३ पैकी ३ सामने जिंकून ऑस्ट्रेलिया आधीच सुपर८ साठी पात्र ठरला आहे. ३ पैकी २ सामने जिंकल्यानंतर आणि एक सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर स्कॉटलंड ५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, इंग्लंडचा ओमानच्या सामन्यापूर्वी स्कॉटलंडपेक्षा चांगला नव्हता. पण आता ओमानवर मोठा विजय नोंदवल्यानंतर, इंग्लंडचा नेट रन रेट (+३.०८१) स्कॉटलंड (+२.१६४) पेक्षा चांगला झाला आहे. मात्र, इंग्लंडचे सध्या ३ सामन्यांतून ३ गुण आहेत. जर त्यांनी त्यांचा पुढील सामना नामिबियाविरुद्ध जिंकला आणि स्कॉटलंडने त्यांचा शेवटचा गट स्टेज सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध गमावला तर इंग्लंड सुपर८ साठी पात्र ठरेल.
इंग्लंडने ३.१ षटकांत ओमानवर मिळवला विजय
इंग्लंडने ओमानवर अवघ्या ३.१ षटकांत विजय मिळवून मोठा इतिहास रचला. यासह पुरूषांच्या टी-२० विश्वचषक २०२४ त्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला संघ ठरला आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात इंग्लंडने ओमानवर सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवत सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. त्यांनी १०१ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. याआधी टी-२० विश्वचषकात एवढा मोठा विजय कोणत्याही संघाला नोंदवता आलेला नाही. हा विक्रम यापूर्वी श्रीलंकेच्या नावावर होता. २०१४ मध्ये त्याने नेदरलँडविरुद्ध टी-२० विश्वचषक सामना ९० चेंडू शिल्लक असताना जिंकला होता.
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवत सर्वात मोठा विजय मिळवलेले संघ
१०१ चेंडू-इंग्लंड विरुद्ध ओमान, २०२४
९० चेंडू – श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स, २०१४
८६ चेंडू – ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामिबिया, २०२४
८२ बॉल-ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, २०२१
८१ बॉल-भारत विरुद्ध स्कॉटलंड, २०२१