सिडनी येथे इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेतील ३९ वा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेवर ४ विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवणारा दुसरा संघ ठरला. श्रीलंकेने इंग्लंडला १४२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडने १९.४ षटकांत ६ गडी गमावून १४४ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा उपांत्य फेरीत जाण्याचा पत्ता कट झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडला प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने १४२ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाकडून जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्सने पहिल्या विकेट्साठी शानदार ७१ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे इथेच इंग्लंड संघाच्या विजयाचा पाय रचला गेला.

त्यानंतर जोस बटलर २८ धावा करुन बाद झाला. त्यानंतर अॅलेक्स हेल्स आणि बेन स्टोक्सने अनुक्रमे ४७ आणि ४२* धावांची भागीदारी केली. हेल्सने इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करताना ३० चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार लगावला. या तीन खेळाडूं व्यतिरिक्त इंग्लंडच्या इतर खेळाडूंना आपली छाप पाडता आली नाही. श्रीलंका संघाकडून गोलंदाजी करताना लहिरु कुमारा, वानिंदू हसरंगा आणि धनंजया डी सिल्वा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. या तिघांनी अनुक्रमे २४, २३ आणि २४ धावा दिल्या.

तत्पुर्वी या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाने आक्रमक सुरुवात केली होती. परंतु चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेला पहिला धक्का बसला. ख्रिस वोक्सने कुसल मेंडिसला (१८) लियाम लिव्हिंगस्टोनकडे झेलबाद केले. त्यामुळे श्रीलंकेने चार षटकांत एक गडी बाद ३९ धावा केल्या.

त्यानंतर पाथुम निसांकाने संघाचा डाव सावरताना शानदार खेळी साकरली. त्याने ४५ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकार लगावत ६५ धावा केल्या. त्याची ही खेळी श्रीलंका संघाकडून खेळली गेलेली सर्वोच्च खेळी होती. त्याचबरोबर भानुका राजपक्साने २२ धावांचे योगदाने दिले. त्यामुळे श्रीलंकेला निर्धारित २० षटकांत ८ बाद १४१ धावा केल्या.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी कर्णधार क्रेग एर्विनचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘विराटला बाद करण्यासाठी…..!’

तसेच इंग्लंड संघाकडून गोलंदाजी करताना, मार्क वुडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकांत २६ धावा दिल्या. तसेच बेन स्टोक्स, अदिल रशीद, सॅम करन आणि क्रिस वोक्सने प्रत्येकी १ विकेट घेतली. दरम्यान इंग्लंड संघाला १४२ धावांचे लक्ष्य मिळाले.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England beat sri lanka by 4 wickets to enter t20 world cup 2022 semi finals vbm