अंत्यंत अटीतटीच्या सामन्यामध्ये इंग्लंडने श्रीलंकेवर निसटता विजय मिळवला आहे. इंग्लंडने हा सामना चार गडी राखून जिंकला. या विजयाबरोबरच पहिल्या गटातून न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडचा संघही उपांत्यफेरीसाठी पात्र ठरला आहे. मात्र इंग्लंडच्या विजयामुळे यजमान ऑस्ट्रेलिया या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानवर विजय मिळवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे ७ गुण झाले असून ते गट-१ मध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. अग्रस्थानावरील न्यूझीलंडचेही ७ गुण असले, तरी त्यांचे नेट रन रेट सर्वोत्तम असल्याने त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. दुसऱ्या स्थानासाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात स्पर्धा होती. मात्र शेवटचा सामना जिंकत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर नेट रन रेटच्या जोरावर मात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> Ind vs Zim: विरेंद्र सेहवागकडून भारताला झिम्बाब्वेविरोधात पराभूत होण्याचा सल्ला? म्हणाला, “विश्वचषक जिंकण्यासाठी एखादा…”

इंग्लंडचा विजय…
पहिल्या गटामध्ये न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे समान म्हणजेच प्रत्येकी सात गुण असले तरी नेट रन रेटच्या जोरावर न्यूझीलंडने कालच उपांत्यफेरीचं तिकीट निश्चित केलं. तर आज इंग्लंडच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं. श्रीलंकन संघाने दिलेलं १४२ धावांचं आव्हान माजी विश्वविजेत्या इंग्लंड संघाने दोन चेंडू आणि चार गडी बाकी असताना पूर्ण केलं. या विजयाबरोबरच ते पहिल्या गटामधून उपांत्यफेरीसाठी पात्र ठरले आहेत. श्रीलंकेने अगदी शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. मात्र बेन स्ट्रोक्सने संयम दाखवत संघाला सामना जिंकवून दिला.

नक्की वाचा >> Ind vs Ban: याला म्हणतात Sportsmanship… भारताच्या विजयानंतर विराट डायनिंग हॉलमध्ये बसलेल्या लिटन दास जवळ गेला अन्…

सध्या दुसऱ्या गटाची स्थिती काय?
या विजयाबरोबरच आता दुसऱ्या गटातील तीन सामने उद्या खेळवले जाणार असून दुसऱ्या गटामधील संभ्रम अद्याप कायम आहे. असं असलं तरी सध्या दुसऱ्या गटामधून भारत आणि दक्षिण आफ्रिकाच उपांत्यफेरीमध्ये प्रवेश करतील असं चित्र दिसत आहे. भारताकडे सध्या सहा गुण आहेत. शेवटचा सामना जिंकून ते आठ गुणांसहीत अव्वल स्थान कायम राखू शकतात. तर दक्षिण आफ्रिकेकडे चार सामन्यांमध्ये पाच गुण आहेत.

नक्की वाचा >> विराटने ‘फेक फिल्डींग’ केली म्हणजे नेमकं काय केलं? त्याच्यावर कारवाई होऊ शकते का? भारताला बसणार का फटका?

रविवारी चित्र होणार स्पष्ट
आयसीसीने निश्चित केलेल्या नियमांनुसार सुपर १२ फेरीमध्ये दोन्ही गटांमधून प्रत्येकी दोन असे एकूण चार संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील. पहिल्या गटामधून आता न्यूझीलंड पहिल्या स्थानी तर इंग्लंड दुसऱ्या स्थानी पात्र ठरला आहे. दुसऱ्या गटातील तीन सामने रविवारी खेळवले जाणार असून त्यामधून अव्वल स्थानी कोण राहणार हे निश्चित होणार आहे. सध्याची स्थिती पाहता सर्व सामने प्रबळ संघांनी जिंकले तर भारत पहिल्या स्थानी कायम राहील तर दक्षिण आफ्रिका हा दुसऱ्या गटातून पात्र ठरणार दुसरा संघ ठरेल.

नक्की वाचा >> Ind vs Ban: बॅट, बॉलऐवजी हातात ब्रश घेत ‘त्याने’ भारतीय संघाला जिंकून दिला सामना; जाणून घ्या या व्यक्तीनं नेमकं केलं तरी काय

भारत पराभूत झाला तर काय?
दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामन्यात विजय झाला आणि भारत झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत झाला तर दक्षिण आफ्रिका सात गुणांसहीत अव्वल स्थानी असेल. तर भारत दुसऱ्या स्थानावर राहून पात्र ठरेल. या उलट झिम्बाब्वेविरुद्धचा सामना भारताने जिंकला किंवा गुण वाटून दिले तर भारत दुसऱ्या गटात अव्वल स्थानी असेल.

नक्की वाचा >> विश्लेषण: नेट रन रेटवर पाकिस्तान In की Out ठरणार? पण NRR कॉलमखाली दिसणारा ‘नेट रन रेट’ म्हणजे काय? तो कसा मोजतात?

भारताला कोणाविरुद्ध खेळावं लागणार?
दुसऱ्या गटातील अव्वल संघ पहिल्या गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी खेळणार आहे. भारत पात्र ठरणार पहिल्या क्रमांकाचा संघ ठरला तर उपांत्यफेरीमध्ये भारताला दुसऱ्या स्थानावरील संघाशी म्हणजेच इंग्लंडविरोधात खेळावं लागेल. भारताचा पराभव आणि आफ्रिकेचा विजय झाल्यास भारताला उपांत्यफेरीतील सामना केन विल्यमसनच्या न्यूझीलंडविरुद्ध खेळावा लागेल.

नक्की पाहा >> Ind vs Ban: के. एल. राहुलचा हा थ्रो ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट; Rain Break नंतर दुसऱ्याच चेंडूवर काय घडलं पाहा Video

पाऊस पडला तर काय होणार?
विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने सुपर १२ फेरीमधील सामन्यांसाठी एकही राखीव दिवस ठेवलेला नाही. त्यामुळेच भारत आणि झिम्बाब्वेदरम्यानच्या सामन्याच्या दिवशी पाऊस झाला तर दोन्ही संघांना एक एक गुण वाटून दिला जाईल. म्हणजेच भारताकडे सात गुण होतील आणि भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. भारत थेट पात्र ठरेल अशासाठी कारण सध्या दुसऱ्या स्थानी असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने आणि तिसऱ्या स्थानी असणाऱ्या पाकिस्तानने आपआपले सामने जिंकले तरी भारत पहिल्या दोन संघामध्ये सात गुणांसहीत जागा निश्चित करु शकतो.

नक्की वाचा >> T20 World Cup सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियात सध्या एवढा पाऊस का पडतोय? जाणून घ्या या धुवाधार बॅटिंगमागील नेमकं कारण

दक्षिण आफ्रिकेने आपल्या उर्वरित सामन्यामध्ये नेदरलॅण्ड्सला पराभूत केलं तरी त्यांचे एकूण सात गुण होतील. म्हणजेच ते गुणांच्या बाबतीत भारताच्या बरोबरीला येतील. असं झाल्यास पाकिस्तानने त्यांच्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशला कशाही पद्धतीने पराभूत केलं तरी त्यांना दोन गुण मिळतील आणि त्यांचे एकूण गुण सहा होतील. म्हणजेच नेट रन रेटचा विचार करण्याची गरजच या स्थितीमध्ये भासणार नाही. प्रत्येकी सात गुण असणारे दक्षिण आफ्रिका आणि भारत पुढील पेरीसाठी पात्र ठरतील. बांगलादेशही पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यास जास्तीत जास्त सहा गुणांपर्यंत मजल मारु शकतो. त्यामुळे सहा तारखेला इतर संघांच्या कामगिरीवर निर्भर न राहता सामना रद्द होऊन गुण वाटून दिले तरी भारत उपांत्यफेरीसाठी पात्र ठरेल.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England vs sri lanka eng advance into semis with win over srl australia knocked out with whom india will play in semifinals after game against zimbabwe scsg