England win T20 World Cup 2022: टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडने पाकिस्तानवर पाच गडी आणि सहा चेंडू राखून विजय मिळवला. इंग्लंडने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव कोरता इंग्लंडच्या संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. असं असतानाच भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने थेट इंग्लंडने नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांचा संदर्भ देत एक मजेदार ट्वीट करत इंग्लंडच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> T20 World Cup Final: …म्हणून इंग्लंडच्या संघातील खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरले

खरं तर उपांत्य फेरीमध्ये भारत आणि इंग्लंड आमने-सामने असल्यानंतर पहिल्यांदा सुनक यांचा पाठिंबा कोणाला यासंदर्भातून चर्चांना सुरुवात झाली. दरम्यान आजही सुनक यांच्या आजोबांचं स्वातंत्र्यपूर्व काळात सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या प्रांतात वास्तव्य असल्याचा संदर्भ देत पाकिस्तानी चाहते चर्चा करत होते. असं असतानाच सुनक यांनी स्वत: इंग्लंडच्या संघाला शुभेच्छा देणारं आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं सांगणार ट्वीट केलं होतं.

इंग्लंडच्या विजयानंतर सुनक यांचाच संदर्भ देत जाफरने एक व्हायरल व्हिडीओ ट्वीट केला आहे. “आज १० डाऊन स्ट्रीटवरील दृष्य काहीशी अशी असतील. इंग्लंडचं अभिनंदन,” अशी कॅप्शन जाफरने दिली आहे. जाफरने ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये दोन ब्रिटीश तरुण दिलेर मेहेंदीच्या तुनक तुनक धू तारारा गाण्यावर नाचताना दिसत आहेत. १० डाऊन स्ट्रीट हा ब्रिटीश पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानाचा पत्ता आहे. याच ठिकाणी सध्या सुनक त्यांची पत्नी आणि दोन मुलींसहीत वास्तव्यास आहेत. जाफरला आपल्या ट्वीटमध्ये आत सुनक भारतीय पद्धतीने इंग्लंडचा विजय सेलिब्रेट करतील असं सूचित करायचं आहे.

जाफरने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांमध्ये तुफान व्हायरल झाला असून त्याला १२ हजारांहून अधिक व्ह्यूज आहेत.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England win t20 world cup 2022 wasim jaffer says british pm rishi sunak will celebrate like this shares funny video with reference to 10 down street scsg