टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तानदरम्यान खेळवण्यात येत असलेल्या अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊण्डवरील या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने इंग्लंडसमोर १३८ धावांचं ध्येय ठेवलं आहे. १९९२ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेप्रमाणेच या वर्षी अनेक गोष्टी जुळून आल्या असून त्या विश्वचषकाप्रमाणे पाकिस्तान यंदाचा विश्वचषकही जिंकेल अशी आशा पाकिस्तानी चाहत्यांना आहे. दोन्ही संघांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. उपांत्य फेरीत खेळलेले ११ खेळाडू घेऊनच दोन्ही संघ अंतिम सामना खेळत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की पाहा >> World Cup Final: बाबर आझमला रशीदने फिरकीत गुंडाळला; स्वत:च्याच गोलंदाजीवर टीपला अप्रतिम झेल, पाहा Video

मात्र इंग्लंडचा संघ क्षेत्ररक्षणसाठी मैदानात उतरला तेव्हा त्यांच्या दंडांवर काळी रिबीन बांधल्याचं दिसून आलं. अंतिम सामन्यामध्ये काळी रिबीन बांधून इंग्लंडचा संघ मैदानात उतरण्यामागे एक विशेष कारण आहे. इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेव्हीड इंग्लीश यांच्या प्रती सन्मान व्यक्त करण्याच्या उद्देशाने ही काळी पट्टी लावण्यात आली आहे. डेव्हीड इंग्लीश हे इंग्लंडमधील क्रिकेटचे गॉडफादर म्हणून ओळखले जायचे. शनिवारी म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी त्यांचं वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झालं.

नक्की वाचा >> विश्लेषण: Eng vs Pak World Cup Final दरम्यान पावसाची १०० टक्के शक्यता! राखीव दिवशीही पाऊस पडला तर… जाणून घ्या नियम

“डेव्हिड इंग्लीश यांच्या मृत्यूची बातमी ऐकून फार वाईट वाटलं. एक व्यक्ती म्हणून ते फार उत्तम होते. त्यांच्याबरोबर वेळ घालवणं फार मजेशीर असायचं. त्यांनी बनबेरी उत्सवाच्या माध्यमातून अनेक उत्तम इंग्लीश क्रिकेटपटू घडवले. त्यांच्या आत्म्याश शांती मिळो,” असं ट्वीट इंग्लंडच्या संघाचा कर्णधार जोस बटलरने शनिवारी सायंकाळी केलं होतं.

याच डेव्हिड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज इंग्लंडच्या संघामधील सर्वच खेळाडूंनी त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर काळी रिबीन बांधली आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why england cricket team is wearing black armbands in 2022 t20 world cup final scsg