Pakistani fan emotional video viral : टी-२० विश्वचषक २०२४ मधील ६ जूनचा दिवस पाकिस्तान संघासाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता. कारण त्यांना अमेरिकेविरुद्ध झालेल्या सुपर ओव्हर सामन्यात ५ धावांनी पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव करुन जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आपल्या ताकदीचा आणि कौशल्याचा संदेश दिला. पाकिस्तानच्या या पराभवाने त्यांच्या चाहत्यांची मनं दुखावली आहेत. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक चाहती पाकिस्तानी खेळाडू आणि पीसीबी आपला संताप व्यक्त करताना दिसत आहे.
वास्तविक, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ७ गडी गमावून १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान संघानेही २० षटकांत ३ बाद १५९ धावा केल्या. यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या अमेरिकेने १८ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ सहा चेंडूत केवळ १३ धावा करू शकला. त्यामुळे पाकिस्तान संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अशा प्रकारे पाकिस्तानी चाहत्यांच्या पदरी निराशा आली.
पाकिस्तानच्या पराभवावर चाहतीने व्यक्त केल्या भावना –
या सामन्यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एक चाहती पाकिस्तानी खेळाडूंच्या खराब कामगिरीवर संताप व्यक्त करताना दिसत आहे. यामध्ये ती बोर्डाला फटकारतानाही दिसत आहे. चाहती म्हणाली, “ह्रदय कसं मोठं करायचं, एकच ह्रदय आहे, त्याचे किती वेळा तुकडे करणार. तुकडे-तुकडे करुन ह्रदय संपवलंय…चकाचूर केलंय. त्यामुळे हृदय कसं मोठं करू? ते कमी जिंकतात आणि जास्त हरतात.” आम्ही तुमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी उपस्थित असते. तुम्हाला सपोर्ट करतो.”
आपली व्यथा मांडताना चाहती पुढे म्हणाली, “तुम्ही आम्हाला कधी कामगिरी करुन दाखवणार आहात? प्रत्येक वेळी फक्त बोलताच, पण कधी चांगलं प्रदर्शन करत नाही. मला आता खरंच वाटतं की तुम्ही इथे फक्त फिरायला येतात आणि स्पर्धेतून बाहेर झालं की माघारी जातात. तुम्हाला आमच्या भावना अजिबात कळत नाहीत. तुम्ही त्यांना पायदळी तुडवता. त्यामुळे मी पाकिस्तानी संघाला कंटाळले आहे आणि आता मला काही माहीत नाही. मी संघाला विनंती करते. आम्ही तुमच्यासाठी ओरडत राहतो. तुम्हाला का ऐकू येत नाही? असे किती दिवस चालणार? तुम्ही आमच्या भावनांना मजाक समजले आहे.”
हेही वाचा – IND vs PAK : विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
रविवारी भारतासोबत पाकिस्तानचा सामना –
आता पाकिस्तानचा संघ ९ जूनला भारताशी भिडणार आहे. न्यूयॉर्कमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची महामुकाबला होणार आहे. भारतीय संघाला आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून आपली विजयी घोडदौड कायम ठेवायची आहे, तर पाकिस्तान संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. भारतीय संघाने अलीकडेच आयर्लंडचा आठ गडी राखून पराभव करून स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतीय संघाचे मनोबल उंचावले आहे.